पोखरी गावाजवळ पिकअप व दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार तरूणांचा जागीच मृत्यू

सिताराम काळे –

पोखरी (ता. आंबेगाव) गावाजवळ पिकअप व मोटार सायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये रवि गायकवाड हा तरूण जागीच ठार झाला असुन दोन जण जखमी झाले असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.

तळेघर वरून घोडेगावला जाणारी पिकअप गाडी नंबर एम. एच. १४ इ.एम.९४१६ तर घोडेगाव वरून भिमाशंकरकडे येणारी शाईन मोटार सायकल गाडी नंबर एम. एच. १४ एफ. वाय. ९६०५ या गाडीवर तिघेजण बसुन चालले होते. पोखरी जवळील ज्ञानेश्वरी हॉटेल समोर सायं. ७ चे सुमारास आले असता समोरासमोर धडक होवुन मोटार सायकलवरील रवि खंडू गायकवाड (वय-२३ रा. निगडाळे) हा तरूण जागीच ठार झाला. तर गणेश सिताराम लोहकरे, अक्षय चिंधु कु-हाडे (दोघेही रा. निगडाळे) हे गंभीर जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी ग्रामीण रूग्णालय घोडेगाव व पुणे येथे पाठविण्यात आले आहे.

गणेश सिताराम लोहकरे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी ऋषीकेष एकनाथ फलके (रा. आमोंडी) याचेवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार जे. आर. वाजे करत आहे.

Previous articleआंबेगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत शंभर दिवस कामाचे अभियानाला चांगला प्रतिसाद-गटविकास अधिकारी जालींदर पठारे
Next articleकोरोनाच्या पार्श्वभूमिवर होळी, धुलीवंदन सण / उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई