आंबेगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत शंभर दिवस कामाचे अभियानाला चांगला प्रतिसाद-गटविकास अधिकारी जालींदर पठारे

सिताराम काळे – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आंबेगाव तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या शंभर दिवस कामाचे या अभियानाला गावांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत ४३९ मंजुर कामांपैकी आतापर्यंत २४ गावांत ७४ ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. तर ७१ गावांतील ३६५ ठिकाणी कामे मंजुर असल्याचे गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी सांगितले.

आहुपे, भराडी, बोरघर, चिखली, ढाकाळे, एकलहरे, गंगापुर बुद्रुक, काळेवाडी-दरेकरवाडी, खडकवाडी, खडकी, कोलतावडे, कोळवाडी-कोटमदरा, लाखणगाव, लोणी, महाळुंगे पडवळ, पाटण, फलोदे, पिंपळगाव तर्फे महाळुंगे, पोखरी, शिंगवे, टाकेवाडी, तिरपाड, वडगाव काशिंबेग, विठ्ठलवाडी या चोविस ग्रामपंचायतींमध्ये ७४ ठिकाणी गाई गोठा, शेळी शेड, कुक्कटपालन, गाळ काढणे, वैयक्तिक विहिर, रस्ता, वृक्ष संगोपन, शौचालय, शोषखड्डा आदि विविध प्रकारची कामे सुरू करण्यात आली आहेत. तसेच आत्तापर्यंत चालू असलेल्या रोजगार हमीतील कामाची सर्व मजुरी मजुरांच्या बॅंक खात्यात जमा झाली आहे.

तर आहुपे, आमोंडी, असाणे, आंबेदरा, आंबेगाव, अवसरी बुद्रुक, भागडी, भराडी, बोरघर, चांडोली बु., चपटेवाडी, चास, चिंचोडी, चिंचोली, चिखली, देवगाव, डिंभे खुर्द, एकलहरे, गंगापुर बुद्रुक/खुर्द,गावडेवाडी,गिरवली,गोहेबुद्रुक/खुर्द,जाधववाडी,जांभोरी,जवळे,कळंब,काळेवाडी-दरेकरवाडी, कानसे, कारेगाव, काठापुर बुद्रुक, खडकवाडी, खडकी, कोलदरा-गोनवडी, कोलतावडे, कोळवाडी-कोटमदरा, कांेढवळ, कुशिरे बुद्रुक, लांडेवाडी-पिंगळवाडी, माळीण, मांदळेवाडी, महाळुंगे तर्फे घोडा, नांदुर, नारोडी, पांचाळे बुद्रुक, पारगांव तर्फे अवसरी, पाटण, पेठ, फदालेवाडी-उगलेवाडी, फलोदे, पिंपळगाव तर्फे घोडा, पिंपळगाव तर्फे महाळुंगे, पिंपरगणे, पोखरी, राजेवाडी, राजपुर, रांजणी, रानमळा, साल, शेवाळवाडी, शिंगवे, शिनोली, सुपेधर, टाकेवाडी, तळेघर, तांबळेमळा, ठाकरवाडी, तिरपाड, वडगाव काशिंबेग, वडगाव पिर या ७१ ग्रामपंचायतींमध्ये ३६५ ठिकाणी कामे मंजुर आहे.

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जास्तीतजास्त सार्वजनिक लाभाची कामे व्हावी, यासाठी आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला सांगण्यात आले आहे. तसेच यामध्ये मजुरांचा सहभाग वाढवण्याच्या सुचना करण्यात आल्या असल्याचे गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी सांगितले.

Previous articleपरवानगीनंतरही भीमाशंकर मंदिर परिसरात शुकशुकाट
Next articleपोखरी गावाजवळ पिकअप व दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार तरूणांचा जागीच मृत्यू