जेजुरी येथील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस; पुणे ग्रामीण LCB शाखेची कामगिरी

अमोल भोसले,उरुळी कांचन

दोन अज्ञात चोरटयांनी चाकूचा धाक दाखवून फिर्यादीस धमकावून पैसे आणि मोबाईल असा एकूण १७ हजार ५०० रुपये चा माल चोरून नेला असताना,पुणे ग्रामीण LCB शाखेने जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणून २ आरोपी ताब्यात घेतले असून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दी.२० मार्च रोजी रात्री १ च्या सुमारास निलेश रात्रीच्या वेळी त्यांच्या झोपडीसमोर झोपलेले असताना दोन अज्ञात चोरटयांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून “तुमच्याकडील पैसे, मोबाईल काढून दया” असे म्हणून दोघांचे मोबाईल जबरस्तीने हिसकावून फिर्यादीचे खिशातील १ हजार ५००/- रुपये असा एकूण १७ हजार ५००/- रुपये चा माल चोरला असुन, फिर्यादी निलेश याने आरडा ओरडा केल्याने शेजारील लोक जागे झाले असताना आरोपी २ मोबाईल व पैसे घेवून पळून गेले.सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना LCB टिमला आरोपी अमोल व तेजस वाघापूर चौफुला चौक ता.पुरंधर जि.पुणे येथे येणार असल्याची बातमी मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा रचून मोठ्या शिताफीने दोन्ही आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला.

अमोल मखन पवार (वय २१ रा.राजेवाडी, शिवनगर पाटी, ता.पुरंधर ) तेजस देवा शिंदे (वय २० रा.शिंदवणे, पांचाळा वस्ती ता.हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.निलेश सुनिल खंडागळे (वय २४ रा.सांगवी पाटण ता.आष्टी जि.बिड. सध्या रा.कोथळे,) यांनी तक्रार केली आहे.

सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सपोनि सचिन काळे, पोसई अमोल गोरे, पोहवा. चंद्रकांत झेंडे, पोहवा. महेश गायकवाड, पोहवा. निलेश कदम,पोहवा. सचिन गायकवाड, पोहवा. सुभाष राऊत, पो.ना. गुरु गायकवाड यांनी केलेली आहे.

Previous articleकमान येथील प्राथमिक शिक्षकाच्या तत्परतेने वाकळवाडीत चार फूटी नागराजाला जीवदान
Next article….अन्यथा संपूर्ण राज्यातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकू – रमेश हांडे