दावडीत जोरदार वादळामुळे घरांचे,पिकांचे नुकसान

राजगुरूनगर- खेड तालुक्यातील दावडी परिसरात रविवारी (ता. २१) सायकांळच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळामुळे शेतीचे, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दावडी परिसरात रविवारी झालेल्या जोरदार वादळामुळे सातपुतेवस्ती येथील सत्यवान मनोहर सातपुते यांचे शेड जमीनदोस्त झाले.लोणकरवाडी येथील बाबूराव रामचंद्र जाधव व निवृत्ती सिताराम दगडे यांचे घर जमीनदोस्त झाले. बाळासाहेब सातपुते यांचा वशरद सातपुते यांचा कारल्याचा बाग भुईसपाट झाला. दत्ता होरे यांच्याशेवग्याच्या बागेचेही नुकसान झाले. जाधवदरा व अंगणवाडी शाळेचे पत्र्यांना व भिंतीला तडे गेले. शैला सुरेश कान्हुरकर यांच्या पॉलीहाठसचे नुकसान झाले. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. या वेळी सरपंच संभाजी घारे व उपसरपंच राहुल कदम यांनी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याची मागणी केली.

या वेळी सरपंच संभाजी घारे, उपसरपंच राहुल कदम, ग्रामसेवक तानाजी इसवे, तलाठी सतिश शेळके, कृषी अधिकारी नवीन कुमार गुंडाळ, ग्रामपंचायत सदस्य अनिल नेटके, रविंद्र कान्हुरकर, रुपेश घारे, युवराज सातपुते व दावडी ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleकेंद्र सरकारने साखर कारखान्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेणे ही काळाची गरज – वळसे पाटील
Next articleकमान येथील प्राथमिक शिक्षकाच्या तत्परतेने वाकळवाडीत चार फूटी नागराजाला जीवदान