काठापुर येथे शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी ; अकरा जणांवर गुन्हा दाखल

प्रमोद दांगट

आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक येथे शेतीच्या वादातून भावकी भावकीतच दोन गटात हाणामारी झाली असून दोन्ही गटाने एकमेकांन विरोधात फिर्याद दाखल केली आहे.या प्रकरणी दोन्ही गटातील ११ जणांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वर्षा मच्छिंद्र करंडे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार फिर्यादी यांची काठापूर बुद्रुक येथे जमीन असून ( दि.१९) ते सासू,पती शेतातील गवत कापत असताना तेथे गोरक्ष सहादु करंडे, नथुराम काशिबा करंडे,सुनंदा नथुराम करंडे, वैशाली गोरक्ष करंडे ( सर्व रा.काठापुर, बु ,ता.आंबेगाव पुणे ) हे त्या ठिकाणी ट्रॅक्टर घेऊन आले व फिर्यादीचे सासरे रामभाऊ करंडे यांना शिवीगाळ केली व मोकळ्या शेतात ट्रॅक्‍टरने फननी करु लागले त्यावेळी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना विरोध केला असता त्यांनी फिर्यादी व तिच्या कुटुंबातील सदस्यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली तसेच शेतातील फणनी चे ही मोठया प्रमाणात नुकसान केले असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.

तर सुनंदा नथु करंडे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार फिर्यादी यांची काठापूर बुद्रुक येथे जमीन असून ( दि.१९) रोजी फिर्यादी चा पुतण्या गोरक्ष सहादू करंडे हा त्यांच्या घराजवळील शेतात ट्रॅक्टर द्वारे फणनी करत असताना त्या ठिकाणी १)मच्छिंद्र बाळू करंडे ,२)चंद्रकांत बाळू करंडे ,३)बाळू रामभाऊ करंडे ,४)लता बाळू करंडे ,५)वर्षा मच्छिंद्र करंडे ,६)ताराबाई रामभाऊ करंडे, ७)सुनिता दत्तात्रय पोखरकर,( सर्व रा.काठापूर बुद्रुक ता. आंबेगाव जिल्हा पुणे ) हे त्या ठिकाणी आले व फननि करत असलेल्या गोरक्ष यास हे आमचे शेत असून आमच्या शेतात ट्रॅक्टर घालायचा नाही असे म्हणत शिवीगाळ करत काठ्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी गोरक्ष याची पत्नी वैशाली गोरक्ष करंडे ही भांडणे सोडविण्यासाठी गेली असता तिलाही मारहाण करण्यात आली. त्यांची मारहाण पाहून फिर्यादी सुनंदा करंडे व तिचे पती हे मारहाण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही लथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली आहे.

याबाबत दोन्ही गटाने एकमेकांन विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून दोन्ही गटातील अकरा जणांविरोधात पोलीस ठाण्यात मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास कड करत आहे.

Previous articleवराळे येथे शेतकरी प्रशिक्षण
Next articleभीमाशंकर कारखान्याच्या ८ लाख १ हजार १११ व्या पोत्याचे पुजन