वराळे येथे शेतकरी प्रशिक्षण

चाकण- वराळे येथे महाराष्ट्र शासन कृषि विभागा मार्फत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियाना अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका योजनेतील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यमाचे अध्यक्ष सरपंच दिनेश लांडगे होते व प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक गोविंद नाळे मंडळ कृषि अधिकारी चाकण हे होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जी. आर. ठाकूर. कृषिपर्यवेक्षक यांनी शेतकऱ्यांना जमिनीची सुपीकता कशी वाढवावी माती परीक्षणा साठी मृदा नमुने कसे घ्यावे याबाबत व ठिबक तुषार सिंचन योजना पिकावर औषध फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.राखूंडे कृषिपर्यवेक्षक  यांनी गोपीनाथ मुंढे-शेतकरी अपघात योजना, मागेल त्याला शेततळे योजना, पीकविमा याबाबत सविस्तर माहिती दिली.
गोविंद नाळे यांनी विकेल ते पिकेल, सूक्ष्म अन्नप्रक्रिया उदयोग,mregs फळबाग लागवड योजना बाबत माहिती दिली.

श्रीमती व्ही. एल. खडतरे सहाय्यक कृषि अधिकारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व सरपंच लांडगे यांनी शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले व आभार मानले.

Previous articleवारु केंद्रातील विद्यार्थ्यांना मोफत वाचनासाठी पुस्तके वाटप
Next articleकाठापुर येथे शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी ; अकरा जणांवर गुन्हा दाखल