वारु केंद्रातील विद्यार्थ्यांना मोफत वाचनासाठी पुस्तके वाटप

पवनानगर – कोथुर्णे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोथुर्णे येथे वाचनवेड संस्था पुणे ह्यांच्या सहकार्याने अभंग प्रतिष्ठान,देहु ह्यांच्या वतीने वारु केंद्रातील सर्व शाळांना विद्यार्थी पूरक वाचनासाठी पुस्तके वाटप करण्यात आली आहे.

यावेळी उपस्थितीत महाराष्ट्र राज्य केंद्र प्रमुख संघटनेचे अध्यक्ष रामराव जगदाळे, जेष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे,ग्रामीण पोलीस गणेश टिळेकर,शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना भालेराव,शिक्षण मंडळाचे सरचिटणीस राजेश राऊत,शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष नितिन वाघमारे,विक्रम भोईटे,संजय ठाकर,नेहा कुलकर्णी,सुरेखा मराठे,पंचशिला सोनकांबळे,लहू शितोळे,चंद्रकांत भालेराव,पोलिस पाटील विश्वनाथ दळवी, शिवाजी ढोले,योगेश ठोसर,हेमंत मोहने यांच्या सह आदीजण उपस्थित होते.

यावेळी जेष्ठ साहित्यिक दादाराव गावडे ह्यांनी त्यांच्या स्वयंलिखित साहित्यातील अनेक कविता सादर केल्या.राज्याध्यक्ष रामराव जगदाळे ह्यांनी साहित्याची गरज आणि वाचन कशाप्रकारे करावे ह्याची उदाहरणे दिली.प्रा.विकास कंद ह्यांनी वाचन वेड संस्था पुणे आणि अभंग प्रतिष्ठानच्या कार्याची रुपरेषा व कार्यपध्दती यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे सूञसंचालन शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष नितिन वाघमारे यांनी केले.तसेच आभार प्रदर्शन सुरेखा मराठे यांनी केले.

Previous articleघोडेगाव पेठ जिल्हा परीषद गटातील विकास कामांसाठी ३ कोटी १० लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध
Next articleवराळे येथे शेतकरी प्रशिक्षण