जुन्नर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहचली १०५ वर

Ad 1

वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आज सतरा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले

नारायणगाव (किरण वाजगे)

वारुळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र, नारायणगाव अंतर्गत आज एकूण १७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहेत. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी एकूण तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते त्यात भर म्हणून आज संध्याकाळी साडे आठ वाजता आलेल्या कोरोना चाचणी अहवालामध्ये एकाच वेळी चौदा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

यामध्ये धनगरवाडी येथील सात रुग्ण धालेवाडी येथील पाच रुग्ण व नारायणगाव तसेच वारूळवाडी येथील प्रत्येकी एक रुग्ण अशा चौदा रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे या परिसरात भयावह असे चिंतेचे वातावरण पसरले आहे. जुन्नर तालुक्यातील एकूण कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या शंभरपेक्षा अधिक झाली आहे .

आत्तापर्यंत जुन्नर तालुक्यात १०५ एवढी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली असून यातील ५६ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ४६ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. अशी माहिती गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोडे व डॉक्टर वर्षा गुंजाळ यांनी दिली.