विठ्ठल थोरात यांची कोरेगावमुळ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन — प्रतिनिधी

कोरेगावमुळ (ता.हवेली) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी विठ्ठल दादासो थोरात यांची बिनविरोध निवड झाली. माजी उपसरपंच लोकेश कानकाटे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने सदरच्या जागेवर बिनविरोध निवड करण्यात आली. कोरेगावमुळच्या सरपंच लता आंनदा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड यांनी सदरचे कामकाज पाहिले.

यावेळी सरपंच लता चौधरी, मा. सरपंच – ग्रामपंचायत सदस्या रोहिणी कानकाटे, कविता काकडे, पुजा शितोळे, मा. उपसरपंच – सदस्य नारायण शिंदे, लोकेश कानकाटे, आप्पासाहेब शिंदे, प्रा. विजय कानकाटे, निखिल पवार, लिलावाती बोधे, रोहिणी रगडे, सुभद्रा पवार, सह सोसायटीचे माजी चेअरमन सुरेश भोसले, युवा कार्यकर्ते मंगेश कानकाटे, उद्योजक दशरथ शितोळे, पोलीस पाटील वर्षा कड, माजी सरपंच ताराचंद कोलते, माजी उपसरपंच विठ्ठल शितोळे, माजी सरपंच प्रमोद बोधे, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष जयसिंग भोसले, मा.तंटामुक्ती अध्यक्ष मुकिंदा काकडे, राजु भंडारे, दत्तात्रय कोल्हे, धनंजय ढावारे, आदी उपस्थित होते. मा.उपसरपंच लोकेश कानकाटे सह विद्यमान उपसरपंच विठ्ठल थोरात यांचा सन्मान सोशल डिस्टनशिंग ठेऊन उपस्थित ग्रामपंचायत सदस्याच्या उपस्थिती मध्ये करण्यात आला. गावाच्या सर्वागीण विकासाला सर्वांना विश्वासात घेऊन चालना देेणार असे नूतन उपसरपंच विठ्ठल थोरात यांनी निवडीनंतर सांगितले.

Previous articleमेपल शेल्टर्स या बांधकाम व्यावसायिकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल
Next articleजुन्नर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहचली १०५ वर