कोविड लसीकरणामुळे वयोवृद्ध नागरिकांना दिलासा – आमदार अशोक पवार

अमोल भोसले

शिरुर ग्रामीण रुग्णालय जवळील बहु उद्देशीय संसाधन व संशोधन केंद्र इमारतीमध्ये कोविड लसीकरण सुरु करण्यात आले असून शिरुर शहर व पंचक्रोशीतील तालुक्यातील नागरिकांनी, वृद्ध महिला ,पुरुष नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिरुरचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी करुन लसीकरणासाठी आलेल्या वृद्ध नागरिकांना शुभेच्छा दिल्या. शिरुर ग्रामीण रुग्णालया शेजारी असणाऱ्या बहु उद्देशीय संसाधन व संशोधन केंद्र इमारतीमध्ये आज पासून कोविड लसीकरण सुरु करण्यात आले याचे उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

यावेळी शिरुर तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे, शिरुर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील, शिरुर वकील संघटनेचे अध्यक्ष गिरमकर, राष्ट्रवादी काँग्रेस लीगल शेती प्रदेश चिटणीस ॲड. शिरीष लोळगे, शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड सुभाष पवार, राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे शहराध्यक्ष ॲड रवींद्र खांडरे, काँग्रेस आय शहराध्यक्ष किरण आंबेकर, राष्ट्रवादी लीगल सेलचे तालुकाध्यक्ष ॲड.प्रदीप बारवकर , राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर नरवडे, अजित डोंगरे, लसीकरणासाठी आलेले नागरिक वृद्ध महिला पुरुष , नर्सेस , आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

लसीकरणाच्या उद्घाटनानंतर आमदार अशोक पवार यांनी कोविड योद्धा नर्सेस व ब्रदर्स डॉक्टर यांचे आस्थेने विचारपूस करुन त्यांना काय अडचण आहे का याची माहिती घेऊन कोरोना संसर्ग काळात करत असलेल्या कामा बद्दल त्यांचे अभिनंदन व आभार मानले. शिरुर शहरातील वृद्ध नागरिकांना कोविड लसीकरण करण्यासाठी बाहेर गावी जावे लागत होते त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता परंतु आता शिरुर शहरात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे त्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगून, प्रथम साठ वर्षाच्या पुढील नागरिकांना व त्यानंतर पंचेचाळीस वर्षाच्या पुढील असे लसीकरण होणार असून महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमात सर्वांनी सहभाग घेऊन नागरिकांनी कोविड लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आमदार अशोक पवार करुन तालुक्यात वाढती करोना बाधीतांची संख्या लक्षात घेता प्रत्येक नागरिकांनी कोरोना चे नियम पाळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

Previous article….त्या रस्त्याबाबत शेतकरी पोलीस स्थानकात तांबे मळा शिवारातील शेतकऱ्यांची रस्त्याची मागणी
Next articleनियमांचे उल्लंघन करणाऱ्या हाँटेल,दुकानदारांवर घोडेगाव पोलीसांची कडक कारवाई