मेपल शेल्टर्स या बांधकाम व्यावसायिकावर फसवणूकीचा गुन्हा दाखल

अमोल भोसले,उरुळी कांचन

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कंपनी मे.मेपल शेल्टर्स बिल्डींग कंन्स्ट्रक्शन कंपनीच्या व्यावसायिक भागीदारावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सचिन चंद्रकांत गायकवाड (वय ३० ) रा.येरवडा जेल क्वार्टस , पहिला चौक ) असे तक्रार
दिलेल्या ग्राहकाचे नाव आहे. या प्रकरणी मे. मेपल शेल्टर्स बांधकाम कंपनीचे भागीदार सचिन अशोक
अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बांधकाम प्रकल्पातील ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या मोफा कायद्यानुसार या बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा गृह प्रकल्प १३ एकर क्षेत्रावर १३ इमारती बांधायच्या स्वरूपाचा जागा मालक व बांधकाम व्यावसायिक अशा भागीदारीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मे. मेपल शेल्टर्स बांधकाम या कंपनीची ‘आपलं घर उरूळी कांचन ‘
शिंदवणे फेज -१ गृह प्रकल्पात तक्रारदार सचिन गायकवाड यांनी ८/५/२०१७ रोजी १ लाख रूपयांचा
धनादेश देऊन सदनिका बुक केली होती. त्यानंतर दि.४/८/२०१७ या प्रकल्पातील बिल्डिंग / विंग ५ मध्ये पहिल्या मजल्यावर सदनिका क्र.ए ५-१०८ ही मिळकत एकूण १६,५९,०००/- किमतीला विक्री केली होती.हवेली सहनिबंधक क्र२३ कार्यालयात या दस्ताची नोंद केली आहे.

खरेदीखत झाल्यानंतर ३१/१२/२०१९ सदनिकेचा ताबा मिळेल असे ग्राहक सचिन गायकवाड यांना
लिहून देऊनही या तारखेअखेर मे. मेपल शेल्टर्स कं.ग्राहकाला ताबा देऊ न शकल्याने अशा स्थितीत प्रकल्पातील साईटवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता , प्रकल्प अर्धवट अवस्थेत काम सुरू नसल्याने ग्राहक सचिन गायकवाड यांनी सदनिकेपोटी घेतलेल्या बँकेच्या कर्जाचे हप्ते कपात होऊ लागल्याने झालेल्या
फसवणूकीमुळे सचिन अगरवाल याचे विरुद्ध सचिन गायकवाड यांनी फसवणूकीची तक्रार दिली आहे.
शिंदवणे फेज -१ मध्ये पुण्यातील ग्राहकाची फसवणूक  बिल्डवर मोफा अंतर्गत गुन्हा दाखल. सदर गुन्हाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी हे करीत आहे.

” या बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक करताना ग्राहकाची फसवणुक झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार मोफा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर बांधकाम व्यावसायिकावर फसवणुकीची एक तक्रार दाखल झाली आहे. अन्य ग्राहकांची फसवणुक झाली असेल तर तक्रारीसाठी पुढे यावे “
पवन चौधरी , सहाय्यक पोलिस निरीक्षक , उरुळी कांचन, पोलीस दूर क्षेत्र

Previous articleजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल नारायणगावात बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल
Next articleविठ्ठल थोरात यांची कोरेगावमुळ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड