Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
नारायणगाव (किरण वाजगे)
नारायणगाव येथील तांबे मळ्यातील शेतकरी आपल्याला शेतात जाण्यासाठी रस्ता मिळावा यासाठी नारायणगाव ग्रामपंचायतमध्ये व नारायणगाव पोलीस स्थानकात आपली कैफियत मांडण्यासाठी आज दुपारी दाखल झाले.

दरम्यान ( दि.१७ ) रोजी तांबे मळा येथील रस्ता तयार करण्याच्या कामावरून नारायणगावचे सरपंच योगेश पाटे व त्यांच्या तीन सहकार्यांवर गुन्हा दाखल झाला होता. या पार्श्वभूमीवर नारायणगाव ग्रामपंचायत मध्ये आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.तांबे मळा येथील रस्त्यासाठी अनेक वर्षांपासून या शिवारातील स्थानिक नागरिक मागणी करत आहे.
आज ही सर्व मंडळी नारायणगाव पोलीस ठाण्यात नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्यासमोर आपली कैफियत म्हणण्यासाठी उपस्थित होते.
आम्हाला नाही तर पुढच्या पिढीसाठी तरी हा रस्ता मिळावा अशी आर्त विनवणी तांबे मळ्यातील शेतकऱ्यांनी केली. यावेळी जेष्ठ नागरिक आणि जेष्ठ महिला पोलीस ठाण्यात आले होते.
यावेळी सरपंच योगेश पाटे, जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुजित खैरे,स्थानिक शेतकरी वसंत तांबे,आनंद तांबे, सचिन तांबे, नारायणगाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, आशिष माळवदकर, ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, भागेश्वर डेरे, ईश्वर पाटे, जालिंदर खैरे, आकाश कानसकर, विकास तोडकरी, नंदू अडसरे, अजित वाजगे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सरपंच योगेश पाटे यांनी प्रसंगी आपण कायदा हातात घेऊन स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू असे सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या.
Download WordPress Themes Nulled and plugins.