वेदिका शिंदे या चिमुकलीच्या उपचारासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आमदार दिलीप मोहिते यांचे आवाहन

राजगुरूनगर- पिंपरी चिंचवड शहरात भोसरी येथील  विकास कॉलनी मध्ये राहणारे सौरभ शिंदे यांची वेदिका सौरभ शिंदे यांची 8 महिन्याची कन्या आहे . अजून जग ही पाहिले नसलेल्या या बाळाला SMA ( spinal muscular atrophy by MLPA) अश्या ह्या भयानक आजराने ग्रासल आहे .या आजार साठी लागणारा खर्च हा तब्बल १७ कोटी रुपये इतका आहे .पण आपल्या सर्वांच्या सहकार्याने , मदतीने आणि एकजूटिने ही चिमुकली यातुन बाहेर येईल हि आशा आहे. आपल्याकडे आज पासुन २ महिने वेळ आहे .आज आपण समाजाच काहीतरी देणं लागतो या विचाराने आपणा सर्वांना मिळुन ह्या कुटुंबाला एक आधार देऊन मदत करायची आहे .जस माझ कुटुंब माझी जबाबदारी तसच ही चिमुकली सुद्धा आपली जबाबदारी आहे.या कुटुंबाला होईल तितकी मदत करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दिलीप (आण्णा ) मोहिते यांनी केले आहे .

 

समाजातील दानशूर व्यक्तींनी या लहानग्या मुलीला मदत करून आपल्या मित्रपरिवाराला ही मदत करण्यास सांगावे असे आवाहन विविध सामाजिक संघटनांकडून देखील करण्यात आले आहे.

Previous articleशिंगवे येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू
Next articleआळंदी शहराध्यक्ष अजय तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन