शिंगवे येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

प्रमोद दांगट, निरगुडसर

शिंगवे ( ता.आंबेगाव ) येथील जगताप मळा येथे नदीच्या बाजूला असलेल्या शेतकरी जालिदंर आरोटे यांच्या विहिरीत सात ते आठ महिन्याच्या मादी बिबट्याच्या पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .

बिबट्या शिकारीच्या शोधात विहिरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.शेतकरी आरोटे यांच्या ही घटना गुरुवार दि.१८ रोजी दुपारी 1 च्या सुमारास लक्षात आल्याने त्यांनी लगेच घटनेची माहिती पोलीस पाटील यांना दिली. पोलीस पाटील गणेश पंडित यांनी या बाबत वनविभागाला कळवले असता वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही आर वेलकर वनपाल वळती,एस एस दहातोंडे, वनरक्षक संपत भोर, व रेस्क्यू टीम सदस्य विलास भोर यांच्या मदतीच्या सहाय्याने विहिरीतून मृत बिबट्या काढन्यात आला. वळती येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. कड यांनी शवविच्छेदन केले.

Previous articleमंचर येथून तवेरा गाडी चोरणारा जेरबंद
Next articleवेदिका शिंदे या चिमुकलीच्या उपचारासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आमदार दिलीप मोहिते यांचे आवाहन