मंचर येथून तवेरा गाडी चोरणारा जेरबंद

प्रमोद दांगट

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथून मोकळ्या जागेत पार्किंग केलेली तवेरा गाडी चोरी प्रकरणी एकाला मंचर पोलिसांनी जेरबंद करण्यात आले आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंचर येथे ११ डिसेंबर २०२० ला तवेरा गाडी (एमएच १५ सीडी १९७४, ही लॉक करून पार्क केली होती. मात्र, गाडीचे लॉक तोडून ही गाडी चोरून नेल्याप्रकरणी गाडीमालक नाझिलअब्बास अजगर अली इनामदार (रा. मंचर, काझीपुरा) यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी सूरजितसिंग राजपालसिंग टाक (वय ३२, रा. बिराजदारनगर, हडपसर, पुणे) यांला भोसरी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्या गुन्ह्याच्या चौकशीत आणि तपासात या आरोपीने मंचर पोलीस ठाणे हद्दीतील तवेरा गाडी चोरल्याचा गुन्हा कबूल केला आहे.

आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस जवान राजेंद्र हिले, विलास साबळे यांनी केली असून, तवेरा गाडी आरोपीकडून ताब्यात घेतली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जवान राजेंद्र हिले करीत आहेत.

Previous articleपेठ येथे गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी
Next articleशिंगवे येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू