पेठ येथे गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी

प्रमोद दांगट

पेठ (ता आंबेगाव ) येथे पुणे नाशिक राष्ट्रीय महा महामार्गावर (दि 18) रोजी सकाळी 9 वाजता हॉटेल आनंद च्या बाजूला एक फोअर व्हीलर गाडी ड्राईव्हर चा ताबा सुटून अचानक पलटी झाली. गाडीने तीन पालटी होऊन सुदैवाने कोणालाही किरकोळ दुखापत सोडता जीवित हानी झाली नाही.

पेठ परिसरात आजचा दुसरा अपघात झाला . 200 ते 300 मीटर अंतरावर काल एका गाडीने पेट घेतला होता.आज सकाळी 9 वाजता क्रमांक MH 14 FM 1884 चे चालक कस्तुप कांतराव वैष्णव वय 41 वर्षे राहणार अवसरी खुर्द ता आंबेगाव हे त्यांची कार घेऊन पुणे येथे जात असताना अचानक रोडच्या कडेला पलटी झाली असून सदर अपघातात कोणीही जखमी झालेले नाही सदर अपघाताची माहिती मृत्युंजय दूत दिलीप धुमाळ यांनी फोनवरून दिली असून आळेफाटा पोलीस महामार्ग पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे व मंचर पोलीस जवान राजेंद्र हिले ,फिरोज मोमीन यांनी प्रत्यक्ष जाऊन भेट दिली.दिलीप पवळे ,अशोक राक्षे,रामदास धुमाळ यांनी यावेळी वाहतूक सुरळीत सुरु करण्या स मदत केली .

Previous articleएमटीडीसी’ च्या पर्यटक निवासातील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण
Next articleमंचर येथून तवेरा गाडी चोरणारा जेरबंद