जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल नारायणगावात बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल

Ad 1

नारायणगाव (किरण वाजगे)

कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे नारायणगाव येथील बांधकाम व्यवसायिक व त्यांच्या व्यवस्थापकावर नारायणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती नारायणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली

या घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सचिन कैलास कोबल यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात दिली. या घटनेतील आरोपी शुभम सुनील बडेरा (वय २९) या तरुण बांधकाम व्यावसायीकासह त्याचा व्यवस्थापक सुनील बिंबाजी वाव्हळ (वय ४०) यांच्यावर कोविंड उपाययोजना २०२० नियम ११ प्रमाणे २, ३, ४ तसेच भा.द.वि. कलम १८८,२६९, २७० या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत हकीकत अशी की, नारायणगाव येथील बाजारपेठ मध्ये बांधकाम चालू ठेवून खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच व त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमविल्यामुळे तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्यामुळे बडेरा व वाव्हळ यांच्यावर कारवाई करण्यात आली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, पोलीस कॉन्स्टेबल साळुंखे व पोलीस कॉन्स्टेबल कोबल हे पेट्रोलिंग करत असताना त्यांच्या ही बाब लक्षात आली त्यामुळे वरील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार कैलास ढमाले करीत आहेत