विकास कामे करणाऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा- आमदार दिलीप मोहिते पाटील

चाकण – नगरपरिषदेमधील प्रभाग क्रमांक दोनमधील स्वीकृत नगरसेवक विशाल नायकवाडी यांनी स्वखर्चाने दीड लाख रुपयांचे चाकण आंबेठाण रस्त्यावरील झित्राईमळा ते केएसएच कंपनीच्या दरम्यान गतिरोधक बसवण्यात आले आहे.तसेच माऊलीनगर येथे दोन लाख रुपयांची स्ट्रीट लाईट व अडीच लाख रुपये खर्च करून श्रीनगर कॉलनीमधील पाण्याची पाइपलाइनचे काम केली आहेत.तसेच गणेशनगर येथील आमदार फंडातून मंजूर झालेल्या सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता आदी कामांचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

शहरातील विकासकामे करणाऱ्याला येणाऱ्या नगरपरिषद निवडणूकीत संधी दिली जाईल तसेच ज्याने आपल्या प्रभागात विकासाची कामे केली आहेत, त्याच्याच पाठीमागे मतदारांनी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर,स्वीकृत नगरसेवक विशाल नायकवाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राम गोरे,विरोधी पक्षनेते जीवन सोनावणे,संगीता नाईकरे,योगेश देशमुख,किरण कौटकर, बाळासाहेब गायकवाड,उद्योजक रणजित जरे,वेंकटेश सोरटे, राहुल नाईकवाडी उपस्थित होते.

Previous articleराज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशांत पवार यांचा सत्कार
Next articleरितेश भोमे यांनी वृक्षारोपण करून आगळावेगळा वाढदिवस केला साजरा