राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशांत पवार यांचा सत्कार

अमोल भोसले,उरुळी कांचन

तेजस फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रशांत प्रकाश पवार राष्ट्रवादी सोशल मीडिया यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कला, क्रीडा, साहित्य, समाजकार्य, शिक्षण ,क्षेत्रात विशेष योगदान असणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. तेजस फाउंडेशनचे अध्यक्ष अभिनेत्री गायिका मेघा डोळस यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र व सभागृह औरंगाबाद येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशांत पवार यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल साधना संजय शितोळे अध्यक्ष महिला नागरी सह.पतसंस्था मर्या.शिरूर
संजयराव चंद्रराव शितोळे संस्थापक अध्यक्ष शितोळे करिअर ॲकॅडमी व साधना विद्यालय, स्टेटबँक कॉलनी यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन प्रशांत प्रकाश पवार यांचा सन्मान केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Previous articleआंबेगाव तालुक्यात महास्वराज योजनेअंतर्गत शेत व पानंद रस्ते शेतकऱ्यांसाठी लोकसहभागातून खुले – तहसीलदार रमा जोशी
Next articleविकास कामे करणाऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा- आमदार दिलीप मोहिते पाटील