आंबेगाव तालुक्यात महास्वराज योजनेअंतर्गत शेत व पानंद रस्ते शेतकऱ्यांसाठी लोकसहभागातून खुले – तहसीलदार रमा जोशी

सिताराम काळे

 आंबेगाव तालुक्यामध्ये जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या महास्वराज्य अभियानातंर्गत लोकसहभागातून पानंद व शेतरस्त्यांसाठी १८ ग्रामपंचायतींमधुन ३६ प्रस्ताव दाखल झाले असुन यातील ९ कामे सुरू झाली आहेत तर ४ कामे पुर्ण झाली असल्याचे तहसिलदार रमा जोशी यांनी सांगितले.

गिरवली येथील अकरा शेतक-यांनी सामंजस्यातून शिवार रस्त्यासाठी प्रशासनास सहकार्य करत रस्ता दिला, त्याचे उद्घाटन तहसिलदार रमा जोषी यांचे हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मंडलाधिकारी योगेश पडाळे, तलाठी दिपक करदुले, गिरवली सरपंच पुजा सैद, उपसरपंच संतोष सैद, पोलीस पाटील रेणुका सैद, ग्रामसेवक एस. डी. शिंदे, प्रथमेश सैद व शेतकरी बांधव उपस्थित होते.

शेत पाणंद रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामाकरीता आवश्यक साधनांची ने आण करण्याकरीता उपयोगात येतात. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी आंतरमशागत, कापणी, मळणी यासारखी कामे यंत्रामार्फत करण्यात येतात. अशा यंत्र सामग्रीची वाहतूक करण्याकरिता पावसाळयातही शेत, पाणंद रस्ते सुयोग्य असणे काळाची गरज आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांचे निर्देषानुसार महाराष्ट्र शासनाच्या महास्वराज्य अभियानातंर्गत लोकसहभागातून ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे तहसिलदार रमा जोशी यांनी सांगितले.

Previous articleभाजपचे आमदार नितेश राणेंनी सरदेसाई केलेल्या आरोपा निषेधार्थ वाघोलीत आंदोलन
Next articleराज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशांत पवार यांचा सत्कार