भाजपचे आमदार नितेश राणेंनी सरदेसाई केलेल्या आरोपा निषेधार्थ वाघोलीत आंदोलन

वाघोली (ता.हवेली) येथे युवासेनेच्या वतीने भाजपचे आमदार नितेश राणेंनी युवासेना सचिव वरुण सरदेसाईवर आरोप केले यांच्या निषेधार्थ पुणे नगर रोड वरील आव्हाळवाडी फाटा येथे आंदोलन करण्यात आहे.यामुळे शिवसेना युवा सेना आणि भाजपात वाद चांगलाच चिघळला असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. पुणे जिल्हा युवा सेनेच्या वतीने वाघोली येथे मोटू-पतलू कार्टूनच्या तयार करून त्यांच्या गळ्यात नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या नावाच्या पाट्या अडकवत त्यांच्या हातात कोबंड्या पकडून नितेश राणे, नारायण राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा युवासेना प्रमुख मच्छिंद्र सातव यांनी बोलताना म्हटले की राणे कुटुंबियाकडून असे बिनबुडाचे आरोप केले तर यापेक्षाही युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.यावेळी पुणे जिल्हा युवासेना प्रमुख मच्छिंद्र सातव

यांच्या सह युवासेना सहसचिव विशाल सातव,तालुका उप अधिकारी संदिप सातव,उपजिल्हा युवा प्रमुख गणेश फडतरे,सुनिल तांबे,स्वप्निल रेड्डी,विकास जासूद ,विजय लोखंडे,गौरव सातव,रामचंद्र पायगुडे,संदिप तांबे,युवराज गायकवाड,अभिजीत सातव ओंकार गुरसानी,किरण राऊत यांच्या सह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleवाघोलीत गेले दोन दिवस सलग ५१ कोरोना रुग्ण तर आज २६ रुग्ण :कोविड सेंटर नसल्यामुळे कोरोना रुग्णांचे हाल
Next articleआंबेगाव तालुक्यात महास्वराज योजनेअंतर्गत शेत व पानंद रस्ते शेतकऱ्यांसाठी लोकसहभागातून खुले – तहसीलदार रमा जोशी