खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा ऑनलाइन होणार

राजगुरूनगर- खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित खेड(राजगुरूनगर )ता.खेड. जि.पुणे.वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत सुचनापत्र ( फक्त सभासदासाठी) कोव्हिड -19 च्या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर शासन परिपत्रकाच्या नियमावलीनुसार संस्थेची सन 2019 – 2020 या आर्थिक वर्षाची 90 वी वार्षिक सभा रविवार दि.21/03/2021 रोजी सकाळी 10.00 वाजता मा. सभापती श्री सुखदेव बाबा मुंगसे यांचे अध्यक्षतेखाली संस्थेच्या सांस्कृतिक भवन पाबळरोड, राजगुरूनगर येथे ऑनलाईन पद्धतीने फेसबुक लाईव्ह द्वारे आयोजित केली आहे .

अहवालातील सूचनापत्रकातील 1 ते 19 आर्थिक विषयासह इतर बाबीवर चर्चा केली जाणार आहे .
सदर सभेसाठी पतसंस्थेमार्फत दिली जाणाऱ्या लिंकद्वारे सभेस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित रहावे हि विनंती खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या. राजगुरूनगर, तसेच सभापती, उपसभापती,मानद सचिव, सरचिटणीस,सर्व संचालक मंडळ खेड यांनी केली आहे

Previous articleपत्रकार हाच खरा मूकनायक-पोलीस निरीक्षक सुनील महाडिक
Next articleमहिला शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी नारायणगावचे सरपंच योगेश पाटे या़ंच्याविरोधात गुन्हा दाखल