पत्रकार हाच खरा मूकनायक-पोलीस निरीक्षक सुनील महाडिक

Ad 1

दौड,दिनेश पवार

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळच्या परिस्थितीस अनुसरून समाजाच्या वेदना प्रकट करण्यासाठी मूकनायक या मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरुवात केली होती, आज त्यांच्या मूकनायक या नावामागचा मतितार्थ लक्षात येतो,कदाचित त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अनेक सर्वसामान्य जनतेच्या वेदना समाजासमोर मांडून त्यांना न्याय मिळवुन देण्याचे काम करताना दिसत आहेत,त्यामुळे पत्रकार हाच समाजातील मूकनायक आहे असे मला वाटते,असे गौरवोद्गार जेजुरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी व्यक्त केले, जेजुरीमध्ये रविवारी भारतीय पत्रकार संघाच्या वर्षपूर्ती व पत्रकार रमेश लेंडे यांची संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मान सोहळा आयोजित केला होता.यावेळी महाडिक बोलत होते.

1

यावेळी भारतीय पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष कैलास पठारे,पुणे शहराध्यक्ष देविदास बिनवडे,पुणे शहर नामदेव गुट्टे,जेजुरी नगरपालिकेचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई,माजी नगरसेवक संपत कोळेकर, सामाजिक कार्यकर्ते यशवंत पडळकर,शाहीर शेख,राहुल घाडगे,समीर शेख,बेलसर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश बुधे, बारामती तालुका उपाध्यक्ष विनोद गोलांडे,कार्याध्यक्ष गणेश मुळीक,सचिव संभाजी महामुनी, प्रसिद्धी प्रमुख जयंत पाटील, नारायण आगलावे,दीपक धेंडे, अतुल काटकर,रियाज सय्यद, गणेश राऊत आदींसह पत्रकार उपस्थित होते