राष्ट्रपती पदक विजेते वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांचा सत्कार

राजगुरूनगर- कनेरसर (ता.खेड) येथील रहिवासी व पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांना पोलीस खात्यातील सर्वोच्च राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल ग्रामविकास प्रतिष्ठान,राजगुरूनगर या संस्थेच्या वतीने अध्यक्ष अशोक टाव्हरे, सचिव सुभाष गोरडे यांनी त्यांचा सत्कार केला.राष्ट्रपती पदक ही खेड तालुक्यासाठी सन्मानाची बाब आहे.

रविंद्र दौंडकर यांना २६ वर्षाच्या सेवेत४०० पेक्षा जास्त बक्षीसे प्राप्त झाली आहेत.२०१० साली तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या हस्ते बेस्ट डिटेक्शन ऑफीसर म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता. १मे२०१८ साली प्रतिष्ठेचे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह त्यांना बहाल करण्यात आले होते.मुंबई,पुणे ठाणे,नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आजपर्यंत सेवा बजावलेले रविंद्र दौंडकर यांनी आपल्या कामगिरीने एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून नावलौकिक मिळविला आहे. पोलीस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस खात्यात रूजु झालेल्या रविंद्र दौंडकर यांना २००८ साली सहाय्यक पोलीस निरीक्षक व २०१३साली पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली. अनेक गंभीर गुन्हे त्यांनी उघडकीस आणले आहेत.सध्या पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक असलेले रविंद्र दौंडकर यांचे कनेरसर गावातील धार्मिक, सामाजिक उपक्रमांमध्ये मोलाचे योगदान असते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांना मानाचे राष्ट्रपती पदक मिळाले ही कनेरसर गावामध्ये व खेड तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी व्यक्त केले.

Previous articleश्रीक्षेत्र थेऊर ग्रामपंचायतीच्या वतीने अपंग कल्याण निधीतून अंध व अपंगांना धनादेशाचे वाटप
Next articleपत्रकार हाच खरा मूकनायक-पोलीस निरीक्षक सुनील महाडिक