श्रीक्षेत्र थेऊर ग्रामपंचायतीच्या वतीने अपंग कल्याण निधीतून अंध व अपंगांना धनादेशाचे वाटप

अमोल भोसले- थेऊर ग्रामपंचायतीच्या वतीने अपंग कल्याण निधीतून, अंध व अपंग बांधवांना दैनंदिन वापरातील उपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येकी १०,००० रु च्या धनादेशाचे वाटप करून सन्मान करण्यात आला. तसेच थेऊर मधील सर्व अंगणवाड्यांना वजन काटे, फॅन, LED टीव्ही व उंची मोजमाप पट्टीचे वाटपही करण्यात आले.

 

यावेळी क्रांतीअग्रणी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व अपंग बांधव, अंगणवाडी सेविका, महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामपंचायतीने केलेल्या मदतीमुळे आम्हाला दैनंदिन वापरातील साहित्य खरेदी करता येणार आहे आणि त्यामुळे आमच्या जीवनात बदल होऊन आम्हाला समाजात ताठ मानेने जगता येणार आहे, अशी प्रतिक्रिया येथे उपस्थित असलेल्या अंध व अपंग बांधवांनी व्यक्त करून ग्रामपंचायतीचे आभार मानले.

यावेळी यशवंतचे माजी संचालक पांडुरंग काळे, पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे, सरपंच शितल काकडे, उपसरपंच भाऊसो काळे, सदस्य, युवराज काकडे, राहुल कांबळे, विठ्ठल काळे, गौतमी कांबळे, सिमा कुंजीर, शशिकला कुंजीर, रुपाली रसाळ, मंगल धारवाड, ग्रामविकास अधिकारी सयाजी क्षीरसागर तसेच मारुती कांबळे, महादेव धारवाड, शरद काकडे, सुखराज कुंजीर, खंडू गावडे, आनंद वैराट, श्रीनिवास वाघ, गणेश रसाळ, शहाजी जाधव, पांडुरंग काकडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Previous articleमारहाण करुन लुटमार करणारे दोन सराईत अट्टल चोरटे जेरबंद
Next articleराष्ट्रपती पदक विजेते वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांचा सत्कार