वाडेबोल्हाई गावच्या वेशीवर कचरा टाकणाऱ्याला २५ हजाराचा दंड

वाघोली- तालुक्यातील स्वच्छ व सुंदर पुरस्काराने सन्मानित झालेल्या वाडेबोल्हाई ग्रामपंचायत हद्दीमध्ये वाघोली येथील पंकज रामचंद्र जाधव यांच्याकडून वाघोली परिसरातील गोळा केलेला कचरा डंपरमध्ये भरून आणून टाकल्याचा प्रकार समोर आला होता.याबाबत बाडेबोल्हाई ग्रामपंचायतच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे माहिती घेत हा प्रकार जाधव यांनी केल्याचे उघडकीस आणले होते.

याबाबत लोणीकंद पोलिस स्टेशन मध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता त्यानंतर वाडेबोल्हाई ग्रामपंचायतच्या वतीने पंकज रामचंद्र जाधव यास संबंधित टाकलेला कचरा उचलण्यास भाग पाडले व कचरा टाकल्या प्रकरणी ग्रामपंचायतच्या वतीने पंचवीस हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.त्यामुळे वाडेबोल्हाई परिसरात कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर आता यापुढे नक्कीच चाप बसणार आहे.

संबंधित व्यक्तीवर वाडेबोल्हाई ग्रामपंचायतने कारवाई केली.परंतु प्राथमिक माहितीनुसार हा कचरा वाघोली परिसरातील असल्याने आता वाघोली ग्रामपंचायत या कचरा उचलणाऱ्या ठेकेदारावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Previous articleपुणे नगर रोडच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह ? स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची नागरिकांची मागणी
Next articleमारहाण करुन लुटमार करणारे दोन सराईत अट्टल चोरटे जेरबंद