पुणे नगर रोडच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह ? स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची नागरिकांची मागणी

शिक्रापुर : पुणे-नगर महामार्गाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वाघोली ते शिक्रापुर दरम्यान सुमारे अंदाजे दोनशे एकोणीस कोटी रुपये खर्च करून रस्ता रुंदीकरणात सह रस्त्याच्या दुतर्फा पावसाळी गटार लाईनचे काम सुरू आहे.हे काम सुरू असताना कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेल्या पावसाळी गटार लाईनला आत्ताच तडे गेल्याचे पाहायला मिळत आहे.तर रस्त्याचे डांबरीकरण करत असताना रस्ता दुभाजकाच्या कडेला असलेली माती उचलून रस्ता दुभाजकावर टाकली जात आहे . त्यामुळे ती माती पुन्हा रस्त्यावर येत आहे.तसेच रस्त्याच्या मधोमध युटिलिटी क्रॉसिंग पाईप टाकने गरजेचे असताना ते देखील टाकले गेले नाहीत अशा आरोप काही नागरिकांनी केला आहे.तर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईट पट्ट्यांची तर अक्षरशा चाळण झाल्याचे पाहायला मिळत आहे.बिंदास्त, बेकायदेशीरपणे केबल वाल्यांकडून तसेच खासगी वेगवेगळ्या ठेकेदारांकडून साईड पट्ट्यांचे खोदकाम केले जात आहे.याकडे देखील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वाघोलीतील नागरिक करत आहे.अशा पद्धतीने सर्व सामान्य नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी केली जात आहे.

याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे लक्ष घालून कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे वाघोलीतील शिवछञपती प्रतिष्ठानचे कल्पेश जाचक आणि शिवदास पवार यांनी सांगितले.तर अश्याच पद्धतीने काम चालू राहिले आणि संबंधित विभागाने याकडे लक्ष न दिल्यास लोकशाही मार्गाने बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.

Previous articleनारोडी येथे वरात केल्याने डीजे मालक , नवरदेवावर गुन्हा दाखल
Next articleवाडेबोल्हाई गावच्या वेशीवर कचरा टाकणाऱ्याला २५ हजाराचा दंड