खासदार डॉ अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके दोघेही झाले कोरंटाइन

नारायणगाव (किरण वाजगे)

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील दोन राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समजल्यानंतर कार्यक्रमांमध्ये त्यांच्या संपर्कात आलेले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सध्या होम क्वारंटाईन झाले आहेत.

त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके हेदेखील होम कोरंटाईन म्हणजेच गृह विलगीकरण झाले आहेत. दरम्यान आमदार बेनके यांनी कोरोना चाचणी करून घेतली असून चाचणी अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे.

आमदार बेनके यांनी सांगितले आहे की, मी जरी होम कोरंटाइन झालो असलो तरी प्रशासनाच्या संपर्कात आहे. त्यामुळे कोणाचीही कामे रखडणार नाहीत.
दरम्यान एक जून ते चार जून या कालावधीत मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणाऱ्या खासदार डॉ. कोल्हे यांचा या दौऱ्याच्या काळात संपर्क आलेले दोन राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. ही बातमी समजल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी तत्काळ स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेतली असून ती निगेटिव्ह आलेली आहे.त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र पुरेशी खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचनेनुसार होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

डॉ. कोल्हे सार्वजनिक कार्यक्रमात अथवा दौऱ्यावर येतात. त्यावेळी काही वेळा कार्यक्रमांदरम्यान नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. काही जण मास्कचा वापर करीत नाहीत. अशा स्थितीत आपल्यामुळे कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये या भावनेतून त्यांनी होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Previous articleउंब्रज येथील घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दखल माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील
Next articleपिंपळगाव (आर्वी) चे माजी सरपंच कोरोना चाचणी अहवालामध्ये आढळले पॉझिटिव्ह