नारोडी येथे वरात केल्याने डीजे मालक , नवरदेवावर गुन्हा दाखल

प्रमोद दांगट

नारोडी ( ता. आंबेगाव ) येथे कुठलीही परवानगी न घेता लग्नकार्यात रात्रीची वरात काढून मोठमोठ्याने डीजे वाजवने तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी केल्याप्रकरणी , डीजे मालक व नवरदेव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक 16/3/2021 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नारोडी गावच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना मोठमोठ्याने गाण्याचा आवाज आला त्यावेळी ते तिकडे गेले असता त्यांना त्या 909 टेम्पो एम.एच. 12 डी.टी. 3394 या गाडीमध्ये डीजे सिस्टीम लावून मोठमोठ्याने गाणी सुरु असल्याचे दिसले.तसेच त्यावेळी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर डीजे समोर 80 ते 100 लोक कोणतेही नियम न पाळता नाचत होते.त्यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता तुषार राजेंद्र उनकुले डीजे मालक व याने निखिल सोपान पिंगळे यांच्या लग्नाच्या वरात निमित्त आम्हाला बोलावले असल्याचे सांगितले.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कुठलीही खबरदारी न घेता कोरोना चा संसर्ग वाढेल असे कृत्य केल्याप्रकरणी डीजे मालक व,नवरदेव यांच्याविरोधात पोलीस कॉन्स्टेबल शरद कुलवडे यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous articleपुणे नाशिक महामार्गावर कार जळून खाक
Next articleपुणे नगर रोडच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह ? स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची नागरिकांची मागणी