पुणे नाशिक महामार्गावर कार जळून खाक

Ad 1

प्रमोद दांगट

पेठ (ता.आंबेगाव) येथील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग वर दि १७ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पेठ बायपास वरील पुलानजीक एक टाटा झेन गाडी क्रमांक एम.एच.१४ इ. वाय.८४५० ही फोर व्हीलर पेट्रोल गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे.या घटनेत कार पूर्णपणे जळून गेली आहे.

गाडी मालक प्रदीप सोमवंशी (रा भोसरी आदित्य नगर) यांना गाडीचा डॅश बोर्डवर सूचना आल्यानंतर त्यांनी गाडी पटकन बाजूला घेतली असता थोडा धुर दिसला. नंतर बोनेट उघडल्यावर जाळ बाहेर आला .जाळ आटोक्यात न आल्यामुळे गाडीने प्रचंड पेट घेतला. आणि पाहता-पाहता गाडी पूर्ण जळून खाक झाली. हायवेवर गाडी पेटल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती तसेच आग व धूर पाहून महामार्गावर बघ्यांची गर्दी झाली होती .पेठ येथील पत्रकार दिलीप धुमाळ यानी महामार्ग पोलीस आणि मंचर पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. याकामी अशोक राक्षे, माजी उपसरपंच अनिल सनस,संजय वाव्हळ यांनी घटनास्थळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली घटनास्थळी आळेफाटा महामार्ग वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे यांच्या सुचनेनुसार लगेचच त्यांचे सहकारी पोलीस फौजदार दादा मोशे,प्रकाश मडके तसेच मंचर पोलिस स्टेशनचे कर्मचारी राजेंद्र हिले ,संजय नाडेकर, उबाळे हे पोलिस कर्मचारी हजर होऊन वाहतूक सुरळीतपणे केली.