वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच मुलानेही सोडले प्राण

प्रमोद दांगट

आग्या मोहळाच्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर वडिलांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच मुलानेही आपले प्राण सोडल्याची दुर्दैवी घटना आंबळे (ता. पुरंदर) येथे रविवारी ( दि. १४) रोजी सायंकाळी घडली आहे. वडील बाबूराव सर्जेराव दरेकर (वय ७३), मुलगा सचिन बाबूराव दरेकर (वय ३६) असे मृत्यू झालेल्या पिता- पुत्रांची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी की, बाबुराव दरेकर हे मुलगा, सुन आणि नातवंडे यांच्यासोबत आपल्या शेतामध्ये गेले होते. शेतात गेल्यावर गाडीतून उतरताच संपूर्ण कुटुंबावर मधमाश्यांनी (आग्यामोहळ) हल्ला चढवला यात दरेकर कुटुंब जखमी झाले यात बाबूराव दरेकर यांच्यावर या माश्यांनी सर्वाधिक हल्ला केला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते.हल्ल्यानंतर उपचारासाठी दवाखान्यात नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, मधमाश्यांच्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाल्याचे कळताच मुलगा सचिन दरेकर यांना हा धक्का सहन झाला नाही अन् हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचेही निधन झाले.या घडलेल्या घटनेने आंबळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Previous articleविनामास्क फिरणाऱ्यांवर घोडेगाव पोलीसांची कारवाई
Next articleपुणे नाशिक महामार्गावर कार जळून खाक