विनामास्क फिरणाऱ्यांवर घोडेगाव पोलीसांची कारवाई

सिताराम काळे

– घोडेगाव पोलीस ठाण्याच्या परीसरामध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेह-यावर मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र तरीही या नियमाचे उल्लंघन करणा-या नागरिकांविरोधात घोडेगाव पोलीसांनी धडक कारवाई करण्यास सुरूवात केली असुन आत्तापर्यंत १२ लाखांची दंड वसुली केली असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.

मागील वर्षी मार्चपासून कोरोनाने थैमान घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने स्वच्छता राखणे, सामाजिक अंतर राखणे व मास्क घालणे बंधणकारक केले. त्यामुळे काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास प्रशासनाला मदत झाली. कोरोना ब-यापैकी नियंत्रणात आल्याने प्रशासनाने जनजिवन पुर्वपदावर आणण्यास हळुहळु सुरूवात केली. मात्र हे करत असतानच पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरूवात केली. अन् प्रशासनाने काही ठिकाणी निर्बंध लागु करण्यास सुरूवात केली आहे.

त्या अनुषंगाने कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी चेह-यावर मास्क परिधान न करणा-या व्यक्तिंकडून घोडेगाव पोलीसांनी १ सप्टेंबर २०२० पासुन ते १८ मार्च पर्यंत ८ हजार ७०० नागरिकांकडून १२ लाख रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. नागरिकांनी यापुढेही वाहन चालविताना तोंडाला मास्क लावावा अन्यथा दंड आकारण्यात येईल, असा इशारा सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी दिला आहे.

Previous articleखासदार डॉ अमोल कोल्हे यांना प्राईम पॉइंट फाउंडेशनचा संसदरत्न पुरस्कार जाहीर
Next articleवडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच मुलानेही सोडले प्राण