खासदार डॉ अमोल कोल्हे यांना प्राईम पॉइंट फाउंडेशनचा संसदरत्न पुरस्कार जाहीर

अमोल भोसले पुणे

 

संसदेतील कामगिरी विचारात घेऊन चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाऊंडेशन आणि इ – मॅगेझीनतर्फे देण्यात येणारा संसद रत्न पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना जाहीर झाला आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार शनिवारी (दि.२०) प्रदान करण्यात येणार आहे.

लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना फाऊंडेशनतर्फे संसद रत्न पुरस्कार दिला जातो. संसदेतील अधिवेशनातील उपस्थिती, चर्चासत्रातील सहभाग आणि उपस्थित केलेल्या प्रश्न इत्यादी निकषांवर पुरस्कारासाठी खासदारांची निवड केली जाते. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आल्याचे फाऊंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी कळविले आहे. विद्यमान सतराव्या लोकसभेमध्ये पदार्पणातच खा. डॉ.कोल्हे यांना पहिला संसद रत्न पुरस्कार मिळणार आहे. खासदार डॉ. कोल्हे यांना पुरस्कार जाहीर झाल्याने विविध स्तरावरुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Previous articleआकस्मित मृत्यूची नोंद झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांनी घातपाताची व्यक्त केली शक्‍यता
Next articleविनामास्क फिरणाऱ्यांवर घोडेगाव पोलीसांची कारवाई