लग्नाची वरात घोडेगाव पोलीस स्टेशनच्या दारात

Ad 1

सिताराम काळे- कोरोना व्हायरस नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सूचना आणि जिल्हाधिकारी यांचे आदेश न पाळल्यामुळे एका लग्नाची वरात थेट घोडेगाव पोलीस ठाण्याच्या दारात पोहोचली.

पिंगळवाडी (ता. आंबेगाव) येथील नवरदेव गणेश रोहीदास खुटाण, लग्न कार्यमालक रोहीदास देवराम खुटाण, डिजे व ऑपरेटर विशाल नारायण बो-हाडे, गणेश सदाशिव फलके (रा. आमोंडी) यांचेवर विनापरवाना वरात काढली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार पोलीस शिपाई अमोल काळे यांनी केली आहे.

रोहीदास खुटाण यांचे घराचे जवळ मोकळया जागेत सोमवारी (दि. १५) रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास लग्नाचे वराती निमित्त मानवी जिवितास धोकादायक असलेल्या कोरोना या विषाणुचा प्रादुर्भाव पसरण्याची जाणीव असतानाही विनामास्क, सोशल डिस्टन्सचे पालन न करता सुमारे १५० ते २०० लोक जमवून वेळेचे बंधन न पाळता विनापरवाना डि. जे. सिस्टीमवर मोठया कर्कश आवाजात गाणी वाजवून सर्वोच्च न्यायालयाचे अटी व शर्तीचे उल्लंघन व कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सूचना आणि जिल्हाधिकारी यांचे आदेश न पाळल्यामुळे नवरदेव, लग्न कार्यमालक, डिजे मालक व ऑपरेटर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदिप लांडे, आतिश काळे करत आहे.

Previous articleडॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाला प्रेरणादायी- गौतमराव खरात
Next articleघोडेगाव ग्रामपंचायतीमध्ये खोटे, मनमानी ठराव, ग्रामपंचायत सदस्यांची लेखी तक्रार