श्री संत सावता महाराज पतसंस्थेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सना काठेवाडी- घोडेगाव

घोडेगाव येथे अग्रगण्य असलेल्या श्री संत सावता महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन श्री पुरुषोत्तम खंडू भास्कर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.

पतसंस्थेचे 23 वे वर्ष असून पतसंस्थेकडे 2 कोटी 30 लाख 45 हजार 144 रुपयांचा निधी आहे.5 कोटी 51 लाख 25 हजार रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेने 4 कोटी 60 लाख 94 हजार रुपयांचे कर्ज वाटप केले असून, संस्थेची विविध बँकांमधील गुंतवणूक 3 कोटी 52 लाख रुपयांची आहे.संस्थेला 2019 -20 या आर्थिक वर्षामध्ये 27 लाख 75 हजार 278 रुपयांचा नफा झाला आहे. पतसंस्थेने सभासद बांधवांसाठी 13 टक्के लाभांश दिला असून पतसंस्थेला सतत ऑडीट वर्ग ‘अ ‘ आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून संत सावता महाराज पतसंस्था ओळखली जाते.

पतसंस्थेचा सामाजिक कार्यामध्ये मोठा सहभाग असून कोरोना महामारीच्या काळामध्ये जनता मेटाकुटीला आली असताना लोकांच्या हाताला काम राहिले नसताना पतसंस्थेने सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे.माननीय मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पतसंस्थेने 10 हजार रुपयांची देणगी दिली आहे.घोडेगाव ग्रामपंचायतने पंचक्रोशीतील गरीब बांधवांसाठी व परप्रांतीय बांधवांसाठी दोन वेळची जेवणाची व्यवस्था केली होती त्यामध्ये पतसंस्थेने एक दिवसाचा संपूर्ण खर्च केला आहे.कोरोना महामारी मुळे लॉकडाऊन काळामध्ये पतसंस्थेने 100 गरीब कुटुंबांना एक महिना पुरेल एवढा उच्च प्रतीचा किराणा अन्नधान्य किती वाटप केले आहे.घोडेगाव येथील बेघर वस्ती मध्ये पहिला कोरोनाचा पेशंट सापडल्यानंतर सदर परिसर सील केला तेथील लोकांचे हातावर पोट असल्याने 25 गरीब कुटुंबांना 15 दिवस पुरेल एवढा उच्च प्रतीचा किराणा अन्नधान्य तिकीट वाटप केले.

सामाजिक बांधिलकीच्या भावनेने घोडेगाव पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचारी वर्गाने कोरोना महामारीच्या काळामध्ये घोडेगाव व पंचक्रोशीतील मध्ये आपला जीव धोक्यात घालून उत्तम बंदोबस्त व व्यवस्था केली त्यांचे ऋणनिर्देश म्हणून पतसंस्थेने सर्व पोलिस बांधवांना मास्क सॅनिटायझर शाल व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान केला.

23 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी संस्थेचे संस्थापक श्री पुरुषोत्तम खंडू भास्कर संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक व संस्थेचे सर्व सभासद बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी प्रशिक्षण अधिकारी हिरामन ढोरे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले तसेच संस्थेचे सभासद देवराम बेल्हवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अहवाल वाचन व आभार संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पुरुषोत्तम भास्कर यांनी केले.

Previous articleआयुष्यभर निष्ठेनं पत्रकारिता केलेल्या वरिष्ठ पत्रकारांना बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेचा लाभ मिळावा -एस.एम.देशमुख
Next articleबी.डी. काळे महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागातर्फे राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन