दिलेला शब्द पुर्ण करणारे आमदार अशोक बापु पवार :१८ मार्च पासून शिरुर ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरण उपलब्ध होणार

अमोल भोसले उरुळी कांचन

शिरुर ग्रामीण रुग्णालय येथे १८ मार्च किंवा १९ मार्च या दिवसापासून कोविड लस उपलब्ध होणार असून, त्यासाठीची परवानगी आरोग्य खात्याकडून मिळाली असल्याची माहिती शिरुर-हवेलीचे आमदार ॲड.अशोक पवार यांनी दिली आहे.

आमदार अशोक पवार यांच्या पाठपुराव्यामुळे शिरुर शहरात लसीकरण सुरू होणार असून यामुळे शहरातील वृद्ध, महिला, व नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शिरुर तालुक्यात याअगोदर प्राथमिक रुग्णालय, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय व काही खासगी रुग्णालयात मध्ये covid-19 लस देण्याचे सुरु केले आहे. काही जणांनी पाहिला तर काही जणांनी दुसरा डोसही याचा पूर्ण केला आहे.परंतु कोवीड लस शिरूर शहरात सुरू करावी यासाठी शिरूर पंचक्रोशील नागरिकांनी आमदार अशोक पवार यांना मागणी विनंती केली होती.शिरुर शहरात कोविड लसीकरण उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार अशोक पवार यांचे शिरूर सर्व नागरीकांनी यांनी आभार मानले आहे.

शिरूर शहर पंचक्रोशी व इतर भागातील नागरिकांना शिरूर शहर सोईस्कर असून शिरूर शहरात ग्रामीण रुग्णालय येथे कोविड लस उपलब्ध करावी अशी मागणी केली होती. शहरातील व पंचक्रोशीतील नागरिकांना कोविड लस घेण्यासाठी करडे शिक्रापूर या भागात जावे लागत असल्याने मोठा त्रास होत होता. यात वृद्ध नागरिकांची शिरूर शहरात लसीकरण सुरू व्हावे अशी मागणी होती. ही मागणी आमदार अशोक पवार यांनी पूर्ण करून शिरूर ग्रामीण रुग्णालय येथे ही लस गुरुवार दिनांक १८ मार्च पर्यंत किंवा एका दिवस पुढे १९ मार्च पासून उपलब्ध होणार असून त्याच्यात सर्व मान्यता मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरुर शहरात कोवीसड लसीकरण उपलब्ध व्हावे यासाठी शहरातील आणि पंचक्रोशीतील नागरिकांची मागणी होती. यासाठी आमदार अशोक पवार यांना विनंती केली होती. त्यादिवशी आमदार पवार यांनी शिरुर शहरात लवकरात लसीकरण सुरू करणार आहे. असा शब्द दिला आणि तो दिलेला शब्दपूर्ण करून शहरातील नागरिकांना दिलासा दिला आहे.

शिरूर ग्रामीण रुग्णालय शेजारी असणारे प्राथमिक रुग्णालयाच्या इमारतीमध्ये शिरूर शहर व पंचक्रोशी व इतर नागरिकांसाठी कोविड लस सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली असून, त्यासाठीचे काम या इमारतीमध्ये सुरू झाले आहे. येथील नागरिकांना कोविड लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. गुरुवार 18 मार्च किंवा19 मार्च रोजी या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. तुषार पाटील अधीक्षक शिरुर ग्रामीण रुग्णालय यांनी सांगितले.

Previous articleआर्मी मध्ये निवड झालेल्या पौर्णिमा कर्णे”चा शिंदे परिवाराकडून भव्य सत्कार
Next articleशिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते व माजी सभापती राजाभाऊ गुंजाळ यांचे निधन