इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षपदी विठ्ठल शिंदे यांची निवड

 आळंदी : इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी तसेच तीे प्रदुषण विरहित राहावी म्हणून गेली अनेक वर्षे सोशल मीडियावर जनजागृती करणारे पत्रकार व सामाजिक कार्याची आवड असणारे अनेक सामाजिक पुरस्कार प्राप्त विठ्ठल शिंदे यांच्या सामाजिक कार्याची निष्ठा पाहून इंद्रायणी सेवा फाउंडेशन पुणे, महाराष्ट्र या संस्थेच्या अध्यक्ष पदी नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

इंद्रायणी सेवा फाउंडेशन या संस्थेच्या वतीने समाजाभिमुखाचे अनेक उपक्रम राबविले जातात. पर्यावरणाचा समतोल राखणे, प्रदूषण, वृक्ष लागवड व संवर्धन, प्राणी व वनस्पती यांचे संरक्षण व विषयुक्त भविष्य, धार्मिक, आरोग्य, शिक्षण, असे अनेक जनजागृती चे कार्यक्रम इंद्रायणी सेवा फाउंडेशन च्या वतीने राबवले जातात. निवडी नंतर विठ्ठल शिंदे यांनी म्हटले आहे की, इंद्रायणी सेवा फाऊंडेशनच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यांनी जो विश्वास टाकला, त्या विश्वासाला पात्र राहून इंद्रायणी सेवा फाऊंडेशनचे ध्येय धोरणे व कार्य समोर ठेवून मी समाज भिमुख व देशहिताचे कार्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शिंदे यांच्या निवडी चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

याप्रसंगी दिनेश कुर्‍हाडे, दादासाहेब करंडे,अनिल जोगदंड, हनुमान घोंगडे, संदीप शिंदे, लक्ष्मणशास्त्री लटपटे, सुरज ठोंबरे, पुरुषोत्तम हिंगणकर दिपक राठोड तसेच इंद्रायणी सेवा फाउंडेशन चे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

Previous articleश्री वाळकेश्वर मंदिरासाठी दिपमाळ अर्पण
Next articleनारायणगाव येथील डॉक्टर गोसावी यांच्या राहत्या घरामध्ये जबरी चोरी