स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांची साथ,भोसे गावची कोरोनावर मात तरीही काळजी घ्यावी-पोलीस पाटील सुनिल ओव्हाळ पाटील

चाकण- कोरोना या भयावह आजाराचा वाढता प्रादुर्भाव संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा हतबल झाली असून खेड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भोसे गावच्या शेजारील गावांमध्ये कोरोना हा आजार पोहचला असून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी भोसे गावचे पोलीस पाटील सुनील ओव्हाळ पाटील हे विशेष काळजी घेत असल्याचे दिसून येत आहेत. भोसे गावात आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. याचे श्रेय स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला जाते. आपणही प्रत्येकाने काळजी घ्यावी. असे आवाहन संतसेवा प्रासादिक दिंडीचे प्रमुख ज्ञानेश्वर वाडेकर यांनी यावेळी केले.

खेड पंचायत समितीचे माजी सभापती कै. मधूशेठ लोणारी यांच्या स्मृती दिनी संदिपभाऊ प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक नितीन लोणारी ,संतोष लोणारी व माजी उपसरपंच सर्जेराव लोणारी यांच्या हस्ते भोसे ग्रामस्थांना चांगल्या प्रतीचे मास्क वाटप करण्यात आले.

याप्रसंगी अण्णांच्या आठवणींना उजाळा देताना अण्णांचे सहकारी भोसे गावचे पोलीस पाटील सुनील ओव्हाळ पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की , सरपंच , सभापती ही पदे “अण्णा” या नावात थिटी वाटत होती. अण्णा या नावात एवढी ताकद होती. भल्याभल्यांची भंबेरी उडत होती. गोरगरीब जनतेच्या न्यायासाठी अण्णांचा शब्द प्रमाण मानला जायचा. अण्णा गेले अन एकवटलेलं गाव विस्कटलं. अण्णांच्या नावाचा फायदा घेत आजचे मतलबी , संधीसाधू , आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे , स्वतःच्या पदाचा उपयोग दलालीसाठी करणे. आजच्या कार्यकर्त्यांना व स्वयंभू नेत्यांना ” दलाल ” हा शब्द चपखल बसतो. अण्णा हे गुरुवर्य होते. गुरू पौर्णिमेच्या दिनी आपल्या सर्वांना सोडून गेले. तब्बल दहा वर्षे लोटली. तुमचा-माझा-गुरुजनांचाही गुरू हरपला. राजकारणी नव्हे तर समाजकारणी लोप पावला. अण्णांचे दुःख सर्वांनाच आहे. त्यांनी आपल्या पदाच्या माध्यमातून भोसे व खेड तालुक्याला एवढे काय दिले की , घेणेकरी यांची गर्दी अण्णांच्या सभोवताली मोठी होती. परंतु त्यांचे विचार , त्यांची काम करण्याची पद्धत कोणी स्विकारली , आत्मसात केली नाही. अण्णा तुम्ही आजही हवे होते. आजच्या बाजारबूनग्यांचा बाजार दिसला नसता.असो ! आपल्या स्मृती दिनी अभिवादन व आपल्या प्रतिमेपुढे नतमस्तक होण्याशिवाय तुम्ही आमहापुढे पर्याय ठेवला नाही.

यावेळी भाऊसाहेब कुटे , ज्ञानेश्वर वाडेकर , विठ्ठल गुंडगळ , बाळासाहेब कुटे , माऊली कुटे , बाळासाहेब जाधव , सिद्धेश कुटे , गणपत गोसावी उपस्थित होते. नियमांचे पालन करीत मास्कचे वाटप करण्यात आले.

Previous articleसोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासून महाळुंगे पोलीस चौकीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा पोलीस पाटलांनी वाढदिवस केला जल्लोषात साजरा
Next articleखासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश ; कतार येथे गेलेले ४९ जण सुखरूप आले घरी