श्री वाळकेश्वर मंदिरासाठी दिपमाळ अर्पण

राजगुरूनगर- वाकळवाडी (ता.खेड) येथील शिवभक्त अमोल अशोक पवळे यांजकडून वाळकेश्वर मंदिरातील दीपोत्सवासाठी १०८ दिव्यांची धातूची दीपमाळ श्रीचरणी अर्पण करण्यात आली.

 अत्यंत गरजेची व शोभादायक ठरणार्‍या दिपमाळेमुळे सण-उत्सव सजणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

यावेळी सतिश पवळे, माजी सरपंच आनंदराव नायकवाडी, खेड तालुका शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष धर्मराज पवळे, उद्योजक दत्ताभाऊ कोरडे, शंकरराव पवळे, खेड तालुका माहिती सेवा समिती अध्यक्ष बाबाजी पवळे, सुबोध पवळे, दिलीप सुके, अॅड. सचिन पवळे, रोहित पवळे, अमोल पवळे आदि मान्यवर उपस्थित होते.

कोरोणाच्या पार्श्वभूमिवर महाशिवरात्री उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला. पुर्णपणे देऊळबंद असल्याने यावर्षी शिवभक्तांनी गर्दी केली नाही. सालाबादप्रमाणे परंपरागत काकडा-आरती, पालखी, काठ्यांची मिरवणूक आदी कार्यक्रम मर्यादित उपस्थितीत संपन्न झाले.

Previous articleश्री वाळकेश्वर मंदिरासाठी दिपमाळ अर्पण
Next articleइंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षपदी विठ्ठल शिंदे यांची निवड