किंगफा कंपणीकडून वाकळवाडीत संगणक व फर्निचर भेट

राजगुरूनगर- किंगफा सायन्स, टेक्नाॅलाॅजी (इंडिया) लिमिटेड कंपणीकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकळवाडी व जऊळके बुद्रुक (ता.खेड) शाळांना प्रत्येकी दोन संगणक आणि एक प्रिंटर देण्यात आला. त्याचप्रमाणे येथील शासनमान्य स्व.रामचंद्र बाळाजी पवळे सार्वजनिक वाचनालयाला चार कपाटे, चार टेबल, आठ खुर्च्या, एक संगणक देण्यात आले. याकामी ग्रामपंचायत सदस्य शिवराज्ञी धर्मराज पवळे यांनी यशस्वी पाठपुरावा केला.

यावेळी कंपणीे सचिव आणि एच.आर.हेड निरणोय सूर, एच.आर.मॅनेजर राहुल कुंभारे, एच.आर.एक्झिक्युटीव्ह निधी राय, सेफ्टी आॅफिसर विवेक थिगळे, खेड तालुका माथाडी संघटनेचे अध्यक्ष सचिनदादा पानमंद, खेड तालुका शिक्षक संघाचे मा.अध्यक्ष धर्मराज पवळे, उद्योजक दत्ताभाऊ कोरडे, चेअरमन कचरुशेठ पवळे, ग्रामपंचायत सदस्य रुपाली पवळे, शिवराज्ञी पवळे, योगेश पवळे, शशिकांत बांगर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाळबाबा पवळे, मुख्याध्यापक बबनराव रेटवडे, वाचनालयाचे अध्यक्ष गुरुवर्य पी.डी.पवळे, सी.ए.निलेश रेटवडे, मा.सरपंच आप्पासाहेब गोरडे, दिपकभाऊ पवळे, अमोल कोरडे, तुकाराम नायकवाडी, प्रल्हादबाबा पवळे, गणेश कोरडे, संजूभाऊ कोरडे, बाबाजी पवळे, रघतवान सर, बाबू शेवाळे, अतुल पवळे, खुशाल पवळे,गुलाब कोरडे, हेमंत कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.

राहुल कुंभारे यावेळी म्हणाले,”शेतकरी कष्टकर्‍यांची मुले वाचन-शिक्षणाने अधिक पुढे जावू शकतात, यासाठी आम्ही हा खारीचा वाटा उचलतो आहोत.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मराज पवळे यांनी केले, दिलिप सुके यांनी आभार मानले.

Previous articleमाजी खासदार आढळराव यांना अपशब्द वापरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी
Next articleश्री वाळकेश्वर मंदिरासाठी दिपमाळ अर्पण