पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी

अमोल भोसले,उरुळी कांचन

महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतिने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या१२४ व्या पुण्यतिथी निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के. अडसूळ यानी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

सदर कार्यक्रमात प्राचार्य डॉ. आर. के. अडसूळ यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्राचा आढावा सांगून सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षण क्षेत्रात कार्य केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा. अमोल बोत्रे यानी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा सांगून इतिहास डोळ्यांसमोर उभा केला. सदर कार्यक्रमाचे सयोजन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. निलेश शितोळे यानी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अनुप्रीता भोर यानी केले. सदर कार्यक्रमात प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. विजय कानकाटे, प्रा. सुजाता गायकवाड, प्रा. डॉ. अविनाश बोरकर , श्री. प्रदिप राजपूत, सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleआंबेगाव तालुक्यात मंडलस्तरावर दर महिन्याच्या दुस-या बुधवारी फेरफार अदालत- तहसीलदार रमा जोशी
Next articleमाजी खासदार आढळराव यांना अपशब्द वापरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी