आंबेगाव तालुक्यात मंडलस्तरावर दर महिन्याच्या दुस-या बुधवारी फेरफार अदालत- तहसीलदार रमा जोशी

सिताराम काळे, घोडेगाव

– आंबेगाव तालुक्यात मंडलस्तरावर दर महिन्याच्या दुस-या बुधवारी फेरफार अदालत घेऊन नागरिकांच्या वारस तक्रारी, नोंदी निर्गत करण्यासाठी संबंधित व्यक्तिंनी आपल्या मंडलस्तरावरील मुख्यालयी उपस्थित राहून मंडल अधिकारी यांना आवश्यक ते कागदपत्र देऊन आपल्या नोंदी निर्गत करून घ्याव्यात, असे आवाहन तहसिलदार रमा जोशी यांनी केले आहे.

तालुक्याच्या महसुल विभागातील वारनोंदी, फेरफार दुरूस्ती, बोजा आदि नोंदी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार प्रत्येक महिन्याच्या दुस-या बुधवारी मंडलस्तरावर फेरफार अदालत घेण्यात येत आहे. घोडेगाव, आंबेगाव, मंचर, कळंब, पारगाव तर्फे अवसरी बु. या मंडलस्तरावर (दि. १० ) रोजी फेरफार अदालत घेण्यात आली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर, तहसिलदार रमा जोषी, मंडलाधिकारी योगेश पडाळे, सिताराम पवार, तलाठी दिपक हरण, संजय गायकवाड, दिपक करदुले, ए. एन. बनसोडे, विकास खोटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडलस्तरावर संपर्क अधिकारी नियुक्त केलेले होते. यावेळी नागरिक संबंधित मंडलाच्या मुख्यालयी उपस्थित राहून अधिका-यांना आवष्यक कागदपत्रे सादर करून आपल्या नोंदी करून घेत होते. तसेच बहुतेक शेतक-यांना नोंदीचे फेरफार, सातबाराचे वितरण करण्यात आले. मागील दोन महिन्यातील फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद मिळाला असून यामध्ये बहुतेक फेरफार नोंदी निर्गत झाल्या आहेत.

Previous articleशेती, पायाभूत सुविधा आणि आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleपद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी