शिक्षकाने दिला पारनेर नगरकरांना शिक्षकाने दिला निलेश लंके सारखा जनसामान्यांचा आमदार -प्रशांत पवार

अमोल भोसले,उरुळी कांचन

शिक्षक या तीन अक्षरी शब्दात मोठा अर्थ दडलेला आहे. शि- विद्यार्थ्यांना शिकवणारा असा तो शिक्षक, क्ष – विद्यार्थिनींची क्षमता ओळखून त्यांना मार्गदर्शन करणारा असा तो शिक्षक, क- विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा असा तो शिक्षक सांगण्याचा उद्देश इतकाच की शिक्षकाची व्याख्या व्याप्त स्वरूपात आहे.

‘कुंभारासारखा गुरू नाही रे जगात वरी घालतो धपाटा आत मात्र आधाराचा हात’. मुल रुपी गोळ्यांना घडवण्याचे आकार देण्याचे काम शिक्षक करतात.
उद्याची संस्कारक्षम आणि सुसंस्कृत पिढी घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. शिक्षक ही ज्ञानाची विहीर असते विद्यार्थ्यांना मनात ज्ञानाची , गुणांची आणि यशाची बाग फुलवण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते.

शाळा ही गावची प्रतिकृती असते, शिक्षक ही शाळेची प्रतिकृती असते आणि विद्यार्थी शिक्षकाची प्रतिकृती असते. म्हणजे शिक्षक समाजातील किती महत्त्वाचा घटक आहे. याचा खोलवर विचार केल्यावर आपल्याला प्रत्यय येतो. एक शिक्षक गावचा कायापालट करू शकतो. समाजाचे परिवर्तन घडवून आणू शकतो. समाजात विचारांच्या बीजांची पेरणी करू शकतो. जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवण्याचे काम शिक्षक करू शकतात. पारनेर नगरकरांना इतिहास घडवणारा सर्वसामान्यांचा आमदार एका शिक्षकानेच दिला. ज्ञानदेव लंके असे त्यांचे नाव .

आमदार निलेश ज्ञानदेव लंके यांच्या रूपाने मतदार संघ किंवा अहमदनगरलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटणारा कर्तुत्ववान कर्तबगार आणि कार्यकुशल असे नेतृत्व उदयाला आले आहे. ज्ञानदेव लंके हे पेशाने शिक्षक त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले.

त्यांच्या हाताखाली शिक्षण घेऊन कित्येकांनी यशाची शिखरे पादाक्रांत केली. वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करून नावलौकिक प्राप्त केला. आपल्या शिक्षकांनी दिलेले संस्कार त्यांनी समाजासाठी खर्ची पाडले. अत्यंत शिस्तप्रिय शिक्षक म्हणून लंके गुरुजींचा नावलौकिक राहिला. शिकवण्याची उत्तम पद्धत विद्यार्थ्यांना सातत्याने भावत गेली.

पुस्तकी ज्ञानाबरोबरच सामान्य आणि व्यावहारिक ज्ञान सुद्धा त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दिले ज्या ज्या गावात त्यांनी ज्ञानदान केले तिथे आपला ठसा उमटवला. नावातच ज्ञान असल्याने ते ज्ञानाचे भंडार समजले जात असत. शिक्षकाची नोकरी करीत असताना गुरुजींनी लोकसंग्रह केला. सामाजिक बांधिलकी जपली, समाजाप्रती आस्था आजही त्यांच्या मनामध्ये कायम दिसते.

अडल्यानडल्याना मदत करणे हा त्यांचा स्वभाव सर्वांनाच भावतो. त्यामुळे आमदार निलेश लंके यांना समाज व्रताचे आपल्या वडिलांकडूनच बाळकडू मिळाले. लहानपणी त्यांच्या मनावर सामाजिक संस्कार झाले. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही जाणीव बालपणातच झाल्याने आमदार निलेश लंके यांच्या मनात समाजासाठी काहीतरी करण्याचे विचार रुजले आणि त्यांनी त्या पद्धतीने कामालाही सुरुवात केली. कोणालाही काही अडचण आली तर हातचे काम सोडून निलेश जी मदती साठी धावत असत. रात्री-अपरात्री मदतीसाठी कुठेही जाण्याची त्यांची तयारी होती आणि आणि आजही ती कायम आहे. स्वार्थाचा लवलेस नसलेला नेता पारनेर नगरचा आमदार झाला या पाठीमागे आई बरोबरच त्यांच्या वडिलांचा ही मोठा वाटा आहे. घरी येणाऱ्या पै पाहुण्यांचे आदरातिथ्य करीत , त्यांच्याशी लंके गुरुजी तोंडभरून बोलतात. आमदारांना वेळ नसेल तर कित्येक ठिकाणी अंत्यविधी किंवा दशक्रिया ला हजेरी लावून संबंधितांच्या दुःखात समरस होणारे हे माजी शिक्षक आजही साधेपणाने वागतात.

मुलगा आमदार झाला तरी आपलं साधे राहणीमान त्यांनी सोडलेले नाही. हाच गुण आमदार निलेश लंके यांच्यात दिसतो. आमदार त्यांच्या आई-वडिलांनी समाजसेवेसाठी सातत्याने पाठबळ दिले. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष खंबीर साथ दिली.

निलेशने पैसे कमावले नसले तरी लोक मिळवली. आज शेकडो चपलांचे जोड आपल्या दारात सुटतात यापेक्षा दुसरी श्रीमंत कोणती असे आमदार महोदयांचे आई-वडील आनंदाने सांगतात. आपल्या मुलाने शून्यातून विश्व निर्माण केले. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीसुद्धा राजकीय आणि सामाजिक क्षितिज गाठू शकते हे दाखवून दिले .
समाजकारण आणि राजकारणामध्ये अर्थकारणाची लुडबुड थांबवण्याचे काम निलेश यांनी केले याचा त्यांच्या जन्मदात्यांना सार्थ अभिमान आहे. ते समाधान त्यांच्या चेहऱ्यावर अनेकदा पहावयास मिळाले. एक शाळा मास्तर चा मुलगा राज्याच्या विधिमंडळात जाऊ शकतो. वेगवेगळे उपक्रम राबून महाराष्ट्र समोर आदर्श ठेवू शकतो.

हे आमदार निलेश लंके यांनी दाखवून दिले. अर्थात त्यापाठीमागे त्यांचे वडील ज्ञानदेव लंके यांचे संस्कार त्याचबरोबर लहानपणीच दिलेले समाजकारणाचे बाळकडू हे विसरता येणार नाही.
वडील शिक्षक असल्याने शिक्षकांचे काय प्रश्न आहेत. हे आमदार निलेश लंके यांना लहानपणापासूनच माहिती आहेत. त्यामुळे राज्यातील तमाम शिक्षक बांधवांच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. शिक्षणाचे महत्व ओळखून पारनेर तालुक्यात ऑनलाइन शिक्षणाचा पाया रचण्याचे काम त्यांनी केले. राष्ट्रपती पुरस्कार विजेते तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांना सोबत घेऊन ऑनलाइन शिक्षणाचा पारनेर पॅटर्न राबवला.

नगर तालुक्यातील अकोळनेर येथील जिल्हा परिषदेची शाळा स्मार्ट डिजिटल करण्यासाठी पुढाकार घेतला. शालेय विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकलचे वाटप केले.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी भगिनींना लॅपटॉप आमदार निलेश लंके यांनी उपलब्ध करून दिले. पारनेर नगर मधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टिकोनातून आ.लंके यांनी पुढाकार घेतला आहे. एकंदरीतच शिक्षक व शिक्षणाप्रती प्रेम आवड आणि त्यासाठी काहीतरी करण्याची जिद्द हे आमदार निलेश लंके यांच्या मनात त्यांच्या वडीलांच्या शिक्षक असल्याने निर्माण झाली हे विसरता येणार नाही. ज्ञानदेव लंके गुरुजींनी महाराष्ट्राला एक सर्वसामान्यांचे नेतृत्व करणारा आमदार दिला.
लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडिया शिरुरचे प्रशांत प्रकाश पवार यांनी माहिती दिली.

Previous articleदावडी येथील श्री महादेव मंदिराला सचिनशेठ नवले यांच्याकडून भांड्याचा सेट भेट
Next articleपारनेरकरांना शिक्षकाने दिला निलेश लंके सारखा जनसामान्यांचा आमदार -प्रशांत पवार