जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खेड पोलिस स्टेशन व महिला सुरक्षा समितीच्या वतीने कर्तुत्ववान महिलांचा सन्मान

राजगुरूनगर-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खेड पोलिस स्टेशन व महिला सुरक्षा समिती यांच्या वतीने सिद्धेश्वर मंगल कार्यालयात पोलिस निरीक्षक सतिश गुरव यांच्या अध्यक्षतेखाली “कोविड योद्धा 2021” सन्मान तसेच शिव व्याख्याते श्री संपतभाऊ गारगोटे,शिवव्याख्याती अँड.सौ.क्रांतीताई कराळे-गारगोटे यांचे “महिला सबलीकरण”यावर व्याख्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.

 वेळी कोविड योद्धा म्हणुन डॉ.ढवळे तसेच आरोग्य कर्मचारी, परिचारिका, महिला पोलिस पाटील,निवेदिका स्वप्ना भुजबळ,महिला पोलिस कर्मचारी तसेच महिला सुरक्षा समिती सदस्या यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन खेड उपविभागीय अधिकारी श्री.अनिल लंबाते साहेब, खेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.सतीश गुरव साहेब, पोलिस उपनिरीक्षक वर्षांराणी घाटे, महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंदे,खेड तालुका पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष श्री.अशोक चौधरी,महिला दक्षता व सुरक्षा समितीच्या अध्यक्षा अँड.सौ.मनीषा पवळे-टाकळकर, रेखाताई क्षोत्रिय,शिवव्याख्याते संपतभाऊ गारगोटे, शिवव्याख्याती अँड.सौ.क्रांतीताई कराळे- गारगोटे, तसेच महिला पोलिस कर्मचारी सुरेखा भोर,सारिका बोरकर,नीलम वारे, महिला सुरक्षा समिती सदस्या जया ताई बैरागी, सौ.संपदा सांडभोर,अँड स्वाती उपाध्ये, सुजाता पचपिंड,संगीता तनपुरे,डॉ शीतल पवार,डॉ रसिका साळुंके,शिल्पा गारगोटे,स्मिता रोकडे,मंगल सोनवणे, सुरेखा डूबे, रुपाली गव्हाणे,अक्षता कानूरकर, संगीता होरे उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शिल्पा गारगोटे यांनी तर प्रास्ताविक अँड.मनीषा पवळे यांनी करून कार्यक्रमाचे आभार पोलिस नाईक सारिका बोरकर यांनी केले.

Previous articleविद्यार्थिनींनी शिक्षणातून आत्मनिर्भर व्हावे : प्रा. नीता डोंगरे
Next articleदावडी येथील श्री महादेव मंदिराला सचिनशेठ नवले यांच्याकडून भांड्याचा सेट भेट