जागतिक महिला दिन कुंजीरवाडी येथे साजरा

अमोल भोसले,उरुळी कांचन

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तालुका कृषी अधिकारी कार्यालय हवेली, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा- आत्मा तसेच लक्ष्मी महिला भाजीपाला व फळे उत्पादक शेतकरी गट (कुंजीरवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिन सोहळा साजरा करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी श्रीम सपना ठाकूर यांनी शेतीमध्ये महिलांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. स्त्रियांनी पणन व विक्री व्यवस्थेमध्ये लक्ष देऊन आर्थिक उन्नती साधण्यासाठी पिकेल ते वीकेल योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना, इत्यादी योजनांमध्ये उत्सपूर्त पणे सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

यावेळी जोशी अग्रॉ इंडस्ट्रीज, धनकवडीचा संचालक कीर्ती जोशी यांनी विविध प्रक्रिया उद्योगाची माहिती दिली.

नजीकच्या थेऊर परिसरातील पेरु व टिळेकरवाडी परिसरातील डाळिंब पिकावर प्रक्रिया करुन तयार करावयाचे पदार्थ व त्यांची विक्री साखळी कशी निर्माण करावी याची माहिती दिली. बदलत्या युगात झटपट परंतु पौष्टिक पदार्थ तयार करण्यासाठी आवश्यक पदार्थ पॅकिंग करून विक्री करण्यासाठी असलेल्या वाव त्यांनी अधोरेखित केला. या प्रसंगी नॅचरल अग्रो कंपनी, मांजरी बुद्रुकचा अध्यक्ष नेहा घावटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मंडल कृषी अधिकारी गुलाब कडलग कृषी विभागाच्या विविध योजनांची विस्तृत माहिती दिली. या प्रसंगी लक्ष्मी महिला भाजीपाला व फळे उत्पादक शेतकरी गट कुंजीरवाडीच्या अध्यक्षा निर्मला धुमाळ यांनी त्यांच्या गटामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध बाबी सांगितल्या व कार्यक्रमात उपस्थित सर्व महिला सहकाऱ्यांचे सुगंधित फुलांचे रोपे देऊन गौरव केला.

याप्रसंगी तनिष्का नयन तुपे या कन्येचा वाढदिवस फळांचा केक कापून साजरा करण्यात आला. पारंपरिक केक न कापता शेतकरी वर्गाच्या फळांची अधिक योग्य दराने विक्री व्हावी व त्यांच्या कष्टाला योग्य मोल लाभावे असा आशावाद यावेळी एकसुराने सर्वांनी व्यक्त केला. गटाच्या सदस्य सुवर्णा कुंजीर, सारिका धुमाळ, श्रीम. अलका धुमाळ, श्रीम. शुभांगी कुंजीर, ऋषाली काळभोर, प्रभावती धुमाळ, इत्यादी गटातील महिला सहकाऱ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आत्मा बी. टी. एम. रेश्मा शिंदे यांनी नियोजन केले तर कृषी सहाय्यक महेश सुरडकर यांनी कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन व्यक्त केले.

Previous articleचाकणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १५ वा वर्धापनदिन सरकारी रुग्णालयात फळे वाटप करून साजरा
Next articleविद्यार्थिनींनी शिक्षणातून आत्मनिर्भर व्हावे : प्रा. नीता डोंगरे