दौंडमध्ये महिला दिनानिमित्त क्रीडा स्पर्धेचे आयोजन

Ad 1

दिनेश पवार,दौंड

महिला दिनाचे औचित्य साधून मार्शल आर्ट बॉक्सींग अँड कराटे ट्रेनिंग स्कूल दौंड च्या वतीने आयोजित केलेल्या आदर्श माता पुरस्कार तसेच विविध क्रीडा स्पर्धेस महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला अनिता बाडकर व सत्यभामा बारटक्के यांना पुरस्कार देऊन गौरवन्यात आले. तसेच क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक शैलाजा मोठे द्वितीय मंगल लोटके यांनी मिळवला.

या विजेत्या महिलांना नगराध्यक्षा शितल ताई कटारिया नगरसेविका अरुणा डहाळे , नगरसेविका पुजा ताई गायकवाड,आकांक्षा काळे, शालन सोनवणे, ह.भ.प. अर्चनाताई साळुंखे या सर्व मान्य वरांच्या शुभ हस्ते गौरवण्यात करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन प्रशिक्षक संतोष सोनवणे यांनी केले होते.विशेष सहकार्य चेतन जरांडे ,श्रुती कटारिया,शुभम वाघ ,खुशी कटारिया,संदीपन बनिक , हर्ष पोकर यांचे लाभले