संत गोरोबा शिक्षण संस्थेच्या वतीने महिला दिन साजरा

दिनेश पवार,दौंड

महिला दिनाचे औचित्य साधून विमाननगर च्या श्री संत गोरोबा शिक्षण संस्थेत महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी संस्थेच्या कार्यवाहक किरण तावरे मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या तीनही शाळांमधील महिला शिक्षकांच्या कर्तृत्वाचा गौरव करून,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर संस्थेच्या कार्यवाह तावरे मॅडम यांचा सन्मान तिनही शाळांच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन करण्यात आला.

 प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सतीश पाटील , तंत्र विभाग प्रमुख गद्रे सर हिंद इंग्लिश मिडीयम गुरुकूल स्कूलच्या प्रिन्सिपल डॉ. प्रिती मानेकर व शिक्षक थोरात सर यांनी आपल्या मनोगतातून समाज जीवनातील स्त्रियांचे स्थान तसेच स्त्रियांच्या आदर व सन्मानाचे महत्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व संस्थेच्या कार्यवाह तावरे मॅडम यांनी स्त्रियांचा आदर सन्मान हा फक्त महिलादिनाच्या दिवशी न करता दैनंदिन जीवनात आपल्या वागण्या-बोलण्यातून केला पाहिजे व तसे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवले पाहिजेत, असे अवाहन आपल्या मनोगतातून केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हायस्कूलचे मुख्याध्यापक घोगे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मासाळ सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व सेवकवर्ग यांचे सहकार्य लाभले

Previous articleकोयाळीच्या ऋतुजा गिलबिलेची महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघात निवड
Next articleदौंडमध्ये महिला दिनानिमित्त क्रीडा स्पर्धेचे आयोजन