आंबेगाव- पंचायत समितीमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सखी कक्ष स्थापन

सिताराम काळे, घोडेगाव

– महिला या सर्वस्तरावर आज पुरूषांच्या बरोबरीने काम करत आहेत. परंतु निसर्गतः महिला शारिरीकदृष्टया पुरूषांपेक्षा भिन्न आहेत. त्यांना मासिक पाळी दरम्यानही काम करावे लागत असताना त्यांना अनेक शारीरिक त्रास तसेच मानसिक बदलवातून जावे लागते. मासिक पाळी दरम्यान आराम करता यावा, यासाठी पंचायत समिती आंबेगाव येथे सखी कक्ष सुरू करण्यात आला असल्याचे गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी सांगितले.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सखी कक्षाचे उद्घघाटन जिल्हा परीषद सदस्य व गटनेते देविदास दरेकर, सदस्या रूपाली जगदाळे, गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांचे हस्ते करण्यात आले. या कक्षामध्ये महिलांसाठी तक्रार पेटी, मासिक पाळी दरम्यान आराम करता यावा यासाठी बेड, सोफा, टेबल, खुर्ची, फॅन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सॅनिटरी नॅपकिन, वेडिंग मशिन, सॅनिटरी नॅपकिन इंन्सीनरेटर, प्रथमोपचार पेटी, संगणक असणार आहे.

जिल्हा परिषदेत तसेच पंचायत समितीत महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याबाबत महिला कर्मचा-यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये अनेक महिला कर्मचा-यांनी तक्रारी व समस्या मांडल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, महिला बालकल्याण सभापती पूजा पारगे व मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्काळ याबाबत कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती आंबेगाव येथे सखी कक्ष उभारण्यात आला, असल्याचे गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी सांगितले.

Previous articleमहिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे- सरपंच संध्या चौधरी
Next articleडोळ्यात मिरची पावडर टाकून लुटले