महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे- सरपंच संध्या चौधरी

अमोल भोसले,उरुळी कांचन

धावपळीच्या युगात महिलांनी आपली जबाबदारी संभाळत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही तर आपल्या आरोग्याची काळजी आपणच स्वतः हा घेतली पाहिजे. महिलांनी वेळेस आहार तसेच आरोग्य तपासणी करुन घ्येण्याचे आवाहन सोरतापवाडीच्या सरपंच संध्या  चौधरी यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त श्री विठ्ठल हॉस्पिटल उरुळी कांचन व ग्रामपंचायत सोरतापवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलानंसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मार्गदर्शन करण्यात आले होते. आरोग्य तपासणीला महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी श्री विठ्ठल हॉस्पिटलच्या संचालिका स्त्री रोग तज्ञ डॉ. प्रज्ञा मचाले यांनी उपस्थित महिलांना आरोग्य विषयी मार्गदर्शन केले.

यावेळी उपसरपंच निलेश खटाटे, ग्रामपंचायत सदस्य शंकर कड, हवेली ता.रा. विद्यार्थी कॉग्रेसचे अध्यक्ष सनी चौधरी, ग्रा.प.सदस्य विजय चौधरी, विलास चौधरी, रविंद्र गायकवाड, पुनम आढाव, सुप्रिया चौधरी, ग्रामविकास अधिकारी संतोष नेवसे , श्री विठ्ठल हॉस्पिटलचा डॉक्टर वर्ग तथा कर्मचारी वर्ग, ग्रामपंचायत कर्मचारी , ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य शंकर कड यांनी केले तर सूत्रसंचलन ग्रामपंचायत सदस्य सनी चौधरी यांनी केले.

Previous article‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून महिला दिनाचे औचित्य साधून महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना शूजचे वाटप
Next articleआंबेगाव- पंचायत समितीमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सखी कक्ष स्थापन