‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून महिला दिनाचे औचित्य साधून महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना शूजचे वाटप

 अमोल भोसले,उरुळी कांचन

“स्वच्छता कर्मचारी खऱ्या अर्थाने आपल्या शहरांची परिसराची स्वच्छता राखून जणू काही लक्ष्मीला, वैभवाला, समृद्धीला वाट करुन देतात. या महिला कर्मचाऱ्यांची पावलं म्हणजे लक्ष्मीचीच पावलं आहेत, असं म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही. म्हणून ही पावलं जपली पाहिजेत” असे प्रतिपादन सुरेंद्र पठारे यांनी केले. ‘सुरेंद्र पठारे फाऊंडेशन’तर्फे महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना ‘महिला दिना’चे औचित्य साधून शूज भेट देण्यात आले. यावेळी पठारे बोलत होते.

“आम्हाला अपेक्षा आहे या छोटयाशा भेटीतून ही लक्ष्मीची पावलं सुरक्षित राहण्यात मदत होईल. या आणि यांसारख्या इतर अनेक उपक्रमांतून स्वच्छतादूत आणि यांसारख्या अनेक समाजातील इतर घटकांना मदत करत राहू, असेही सुरेंद्र पठारे म्हणाले. या शिवाय फाऊंडेशन कडून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या दररोजच्या न्याहारीचीही काळजी घेण्यात येते.

यावेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेविका संजीलाताई पठारे, नगरसेविका सुमनताई पठारे, नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, वार्ड ऑफिसर सुहास जगताप, आरोग्य अधिकारी शंकर जगताप, आरोग्य निरीक्षक समीर खुळे, सुषमा मुंढे, शुभांगी आभोनकर, तसेच सीमा तनवर, सर्वजित कोराड, स्वाती खटके आदी उपस्थित होते.

Previous articleसुरेंद्र पठारे फाऊंडेशन’कडून महिला दिनाचे औचित्य साधून महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना शूजचे वाटप
Next articleमहिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे- सरपंच संध्या चौधरी